शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

वैभव जपायचे तर योग्य भाडे हवेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:48 IST

अत्याधुनिक सुरेश भट सभागृहामुळे नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या प्रकल्पावर ७८ कोटींंचा खर्च झाला आहे. वैभव कायम ठेवण्यासाठी सभागृहाची व्यवस्थित देखभाल करावी लागले.

ठळक मुद्देसुरेश भट सभागृह : व्यावसायिक संस्थांना सवलतीची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवकंनागपूर : अत्याधुनिक सुरेश भट सभागृहामुळे नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या प्रकल्पावर ७८ कोटींंचा खर्च झाला आहे. वैभव कायम ठेवण्यासाठी सभागृहाची व्यवस्थित देखभाल करावी लागले. पाच हजारांच्या भाड्यातून ते शक्य होणार नाही. तसेच अत्यल्प भाडे आकारले तर उद्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाची गर्दी होऊन सभागृहाला समाजभवनाचे स्वरूप येईल. हौशी व कलापे्रमी संस्थांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यांना माफक दरात सभागृह उपलब्ध करण्याला विरोध नाही. पण व्यावसायिक संस्थांना बाजारभावाप्रमाणे भाडे आकारावे लागेल तरच सभागृहाची देखभाल करता येईल.दोन हजार आसनक्षमता असलेल्या सभागृहामुळे कलावंतांना व्यासपीठ निर्माण झाले आहे. केद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शैक्षणिक संस्थाना पाच हजारात सभागृह उपलब्ध व्हावे, अशी भावना व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. सर्वच संस्थांना पाच हजारात सभागृह उपलब्ध होणार असल्याचा प्रचार सुरू आहे. किमान ना नफा ना तोटा या तत्त्वावर सभागृहाचे भाडे आकारणी होण्याची गरज आहे. देखभाल व दुरुस्तीचा खर्च निघाला तरच सभागृह व्यवस्थित चालू शकेल. यासाठी व्यावसायिक ,राजकीय तसेच अन्य संस्थाकडून भाडे वसुली करण्याबाबत सादर करण्यात आलेला प्रस्ताव योग्यच आहे. शुक्र वारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी तो ठेवला जाणार आहे.सभागृहाचे भाडे आकारण्यासाठी वेगवेगळे मापदंड तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या संस्थानिहाय कार्यक्रमासाठी भाड्याचे टप्पे ठरविले जाणार आहे. महापालिकेला सभागृह चालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाºयांनी मुंबईतील षण्मुखानंद व इतर दोन, दिल्लीतील सिरीफोर्ट, पुण्यातील सभागृह अशा एकूणआठ सभागृहाच्या कामकाजाचा अभ्यास करून भाड्याचे टप्पे तयार केले आहे.सभागृहाच्या आरक्षणासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने प्रारुप नियमावली व प्रस्तावित भाडे निश्चित केले आहे. या स्थायी समितीच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.अव्यावसायिक व व्यावसायिक संस्थांसाठी सभागृहाचे भाडे वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. यात प्रायोगिक नाटक, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आदी संस्थांसाठी १२,९८० ते ३६,५८० इतके भाडे ठेवण्यात आले आहे. बाल्कनीसह सभागृह सभागृहाचे भाडे अधिक आहे. बाल्कनी शिवाय सभागृह वापरावयाचे असल्यास भाडे कमी आकारण्यात येणार आहे. तसेच सकाळी ८.३० ते ११.३० या सत्रासाठी भाडे १२९८० ते २४७८० आकारण्यात येणार आहे. दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेसाठी १७७५० ते २९५०० तर सायंकाळ व रात्रीच्या सत्रासाठी सर्वाधिक भाडे ठेवण्यात आले आहे. यात २४,७८० ते ३६,५८० इतके भाडे आकारण्यात येणार आहे.व्यावसायिक नाटक, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, जादूचे प्रयोग, आर्केस्ट्रा व फॅ शन शो आदीसाठी १७,७०० ते ५३,१०० इतके भाडे आकारण्यात येणार आहे. सकाळच्या कार्यक्रमासाठी भाड्याचे दर कमी असून सायंकाळी व रात्रीसाठी दर अधिक ठेवण्यात आले आहे.सभासंमेलन, परिषद, परिचर्चा (शासन उपक्रम वगळून ) अशा कार्यक्र मासाठी सर्वाधिक दर ठेवण्यात आले आहे. यात २४,७८० ते ६०,१८० भाडे द्यावे लागणार आहे. सभागृहाचा वापर बाल्कनीसह करावयाचा असल्यास भाड्याचे दर अधिक आहे.तसेच बाल्कनी शिवाय कमी आसनक्षमते करिता भाडे कमी आकारण्यात येणार आहे. बालनाटक व हौशाी नाटक यासाठी सर्वात कमी दर आकारण्यात येणार आहे. अशा कार्यक्रमासाठी सकाळी व दुपारी अशा दोनच सत्रात सभागृह उपलब्ध होणार आहे. यासाठी १२,९८० ते २४,७८० इतके भाडे द्यावे लागणार आहे.सभागृहासाठी नियमावलीसभागृह भाड्याने देताना यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यात सभागृहाचा वापर नाटक, संगीत, नृत्य, संमेलन सांस्कृतिक व आध्यात्मिक व्याख्याने, व्यावसायिक चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या दराने सभागृह उपलब्ध करण्यात येईल. सभागृहाचे आरक्षण आॅनलाईन करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमाच्या आधी ३० दिवस आॅनलाईन अर्ज करावा लागेल. कमीत कमी पाच दिवस आधी अर्ज करता येईल. अर्ज विहीत नमुन्यातच करावा लागणार आहे. आरक्षणाचे भाड्यासह ५० हजार रुपये अनामत रक्कम आकारण्यात येईल. सभागृहाचे कोणतेही नुकसान न झाल्यास ही रक्कम परत करण्यात येईल. सभागृहाचे आरक्षण सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री अशा कालावधीसाठी उपलब्ध राहील. कालावधीनुसार भाडे आकारण्यात येईल. सभागृह भाड्याने देण्यासाठी नियमावली तयार केली आहे.