शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची उधळपट्टी, जिवंत झाडांचा पत्ता नाही

By admin | Updated: August 15, 2015 03:04 IST

नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

मनपाच्या वृक्षलागवडीची चौकशी करा : जनमंचची मागणीनागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे वृक्ष संवर्धनाच्या नावावर २०१२ ते २०१५ या काळात वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली, याबाबतचा पुरेसा अहवालच मनपाकडे नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे मनपाच्या वृक्षारोपण कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या वृक्षारोपनाच्या चौकशीची मागणी जनमंचने केली आहे.सामाजिक संघटना जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांच्यातर्फे माहितीच्या अधिकारात मनपाच्या उद्यान विभागाकडे जून २०१२ ते जून २०१५ या कालावधीत वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत लावण्यात आलेली झाडे, यापैकी जिवंत असलेली झाडे आणि या उपक्रमावर झालेला खर्च याबाबत माहिती मागविण्यात आली. याअंतर्गत मनपाकडून मिळालेल्या माहितीवरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्यान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे २०१२ ते २०१३ या कालावधीत विभागाद्वारे १ लाख २७ हजार रोपटे लावण्यात आली. २०१३-२०१४ या काळात २३ हजार ५२७ वृक्ष लावण्यात आली, तर २०१४ ते २०१५ या कालावधीत केवळ १८ हजार २२१ झाडे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापैकी जिवंत उरलेल्या झाडांबाबत प्राप्त माहितीनुसार २०१२-२०१३ या काळातील केवळ ४८ हजार ७११ झाडे जगू शकल्याचे समजते. २०१३-२०१४ या कालावधीतील केवळ १६०० झाडे जिवंत आहेत, तर २०१४-२०१५ या काळातील केवळ ७८८२ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. वृक्षारोपण हे लोकसहभागातून झाल्यामुळे उर्वरित झाडांची माहिती मिळणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लागलेल्या खर्चाबाबत मनपाने संभ्रम निर्माण करणारे उत्तर दिले आहे. उद्यान विभागतर्फे २०१४ ते २०१५ या कालावधीत वृक्षारोपणावर २६ लाख ३६ हजार ९२२ खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आल्याचे कारण देत २०१२-२०१३ आणि २०१३-३०१४ चा खर्च सादरच करण्यात आला नाही. वृक्षलागवडीनंतर झाडे जगविणे शक्य नसल्यास लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. हिरवळीच्या नावाखाली हिरव्या व लाल नोटा खिशात भरण्यासाठीच हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिकेने तीन वर्षात केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी प्रमोद पांडे यांनी केली आहे.(प्रतिनिधी)