शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या रिंगणात ‘आप’ नाही

By admin | Updated: November 6, 2016 02:14 IST

दिल्लीनंतर गोवा व पंजाबमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान उभे करणाऱ्या आम आदमी पार्टीने भाजपचे ऊर्जाकेंद्र असलेल्या संघभूमी नागपुरात आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत.

पंजाब व गोव्यावर लक्ष केंद्रित : आंदोलने सुरू राहणारकमलेश वानखेडे  नागपूरदिल्लीनंतर गोवा व पंजाबमध्ये भाजपसमोर तगडे आव्हान उभे करणाऱ्या आम आदमी पार्टीने भाजपचे ऊर्जाकेंद्र असलेल्या संघभूमी नागपुरात आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत. नागपूर महापालिकेची निवडणूक न लढण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे. एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर हल्ला चढवत असताना नागपुरात मात्र भाजप विरोधात निवडणूक न लढण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने नागपुरात दमदार एन्ट्री केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नागपूरच्या रिंगणात उतरल्या होत्या. ज्या पक्षाशी नागपुरात साधी शाखा देखील नव्हती त्या पक्षाला तब्बल ७२ हजार मते मिळाली. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतरही कार्यकर्ते खचले नाहीत तर उलट अधिक जोमाने कामाला लागले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चे उमेदवार रिंगणात नव्हते. त्यावेळी नागपुरात पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतरही महापालिका, नागपूर सुुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, वाहतूक पोलीस, भूमी अभिलेख यासह विविध शासकीय कार्यालयाशी संबंधित नागरिकांच्या प्रश्नांवर ‘आप’ने आंदोलन सत्र सुरू ठेवले. रस्त्यांवरील खड्डे, उड्डाणपुलांची मागणी, पाणीपुरवठा यासारख्या नागरी प्रश्नांसाठी ‘आप’चे कार्यकर्ते सातत्याने रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत ‘आप’पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल व येथेही भाजपचा ताप वाढेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, नागपुरात न लढण्याची भूमिका ‘आप’ने घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर रहावे लागणार आहे.आधी विधानसभा, नंतर मनपानागपुरात ‘आप’ विजयी झाली तरी राज्यातील भाजपचे सरकार काम करू देणार नाही. विकास कामांसाठी निधी देणार नाही. दिल्लीची परिस्थिती येथेही निर्माण होईल व नागपूरकरांना वाटेल की ‘आप’चे लोक काम करीत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातही आधी विधानसभा ताब्यात घ्यायची व नंतर स्थानिक निवडणुकांच्या रिंगणात उतरायचे, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.- देवेंद्र वानखेडे संघटक व माजी विदर्भ संयोजक