शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

-तर भिंगारे, वसू यांना पुन्हा संधी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

कळमेश्वर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कळमेश्वर पंचायत समितीअंतर्गत ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले कोहळी गणाचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती ...

कळमेश्वर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कळमेश्वर पंचायत समितीअंतर्गत ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले कोहळी गणाचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती श्रावण भिंगारे व तेलकामठी गणाच्या सदस्या मालती वसू यांचे सदस्यत्व रद्द झाले. मात्र, नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत कोहळी पंचायत समिती गण सर्वसाधारण व तेलकामठी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुका झाल्यास कोहळी गणात काँग्रेसकडून श्रावण भिंगारे व तेलकामठी गणात मालती वसू यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यास जि.प.च्या १६ आणि पं.स.च्या ३१ गणात निवडणुका निश्चित होतील. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे.

सभापती भिंगारे यांनी पुन्हा निवडणूक घेण्याच्या एकूणच प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ग्रामीण भागात राजकीय व्यक्तींना खूप संघर्ष करावा लागतो. निवडणूक लढणे साधे काम नाही. प्रशासन तसेच निवडणूक आयोगाने पूर्वीच यावर विचार करून निर्णय घ्यायला हवा होता. आता त्यांच्या चुकीचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडण्याचा धोका निर्माण झाला आहे.