शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईवरून टेकानाक्यात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST

शहरात ३५१ ठिकाणचे अतिक्रमण हटविले, चार ट्रक सामान जप्त, ३०,५०० रुपये दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या ...

शहरात ३५१ ठिकाणचे अतिक्रमण हटविले, चार ट्रक सामान जप्त, ३०,५०० रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे शहरभरात विविध झोनअंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी टेकानाका येथे या कारवाईला विरोध झाल्याने तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती. दयानंद पार्क जरीपटका येथेही कारवाईला विरोध करण्यात आला. गुरुवारी शहरात एकूण ३५१ ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी १२ ठेल्यांसह ४ ट्रक सामान जप्त करण्यात आले तसेच ३०,५०० रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला.

आसीनगर झोनअंतर्गत सिद्धार्थनगर, नवी वस्तीपर्यंत फूटपाथवर अवैधपणे बनविण्यात आलेले १७ झोपडे आणि टिनाचे अवैध शेड तोडण्यात आले. सहा हजार रुपयाचा दंडही वसूल करण्यात आला. कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांनी पथकाला घेराव घालून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु या परिस्थितीतीतही अतिक्रमण हटविण्यात आले.

दुसरीकडे मंगळवारी झोनअंतर्गत दयानंद पार्कजवळील चायनीज ठेलेवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला जोरदार विरोध झाला. परंतु अतिरिक्त पोलीस बोलावून कारवाई करीत सहा ठेले जप्त करण्यात आले. यावेळी ३८ अतिक्रमण हटवून तीन हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

लक्ष्मीनगर झोनमध्ये छत्रपती चौक ते जयताळा बाजारपर्यंत ठेले व दुकानांचे जवळपास ३५ अतिक्रमण हटविण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत झोन कार्यालय ते गोकुळपेठ बाजार, रामनगर, रविनगर, लॉ कॉलेज चौक, परत गोकुलपेठ बाजार रोडपर्यंत फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यानंतर मोर हिंदी प्राथमिक शाळेसमोरील भाजीपाला विक्रेत्यांचे ठेले व दुकान हटविण्यात आले. व्हीआयपी रोड ते नेताजी मार्केटपर्यंत फूटपाथ ते चायनीज ठेले व दुकाने हटविण्यात आली. यादरम्यान ५६ अतिक्रमण हटवून एक ट्रक सामान जप्त करण्यात आले.

हनुमाननगर झोनअंतर्गत झोन कार्यालय ते मानेवाडा चौक, ओंकारनगर चौक, शताब्दीनगर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूचे ४२ अतिक्रमण हटविण्यात आले. येथून एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. नेहरूनगर झोनअंतर्गत दत्तात्रयनगर ते सक्करदरा फायर स्टेशन, आशीर्वादनगर दरम्यानचे अतिक्रमण हटविण्यात आले. गांधीबाग झोनअंतर्गत पन्नालाल देवडिया शाळा ते नंगा पुतळ्यापर्यंत रस्त्यावरील खाद्यपदार्थाचे सहा ठेले जप्त करण्यात आले. परिसरातील ३८ अतिक्रमण हटविण्यात आले.

सतरंजीपुरा झोनमध्ये मारवाडी चौक ते नेहरू पुतळा, मस्कासाथ, तबला मार्केट, भारतमाता चौक, गोळीबार चौक यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविण्यात आले. यानंतर दहीबाजार ते इतवारी रेल्वेस्टेशन, शांतिनगर पेट्रोलपंप, शांतिनगर घाटदरम्यान ५६ अतिक्रमण हटविण्यात आले. येथून एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. लकडगंज झोनअंतर्गत डिप्टी सिग्नल ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंत, त्रिलोक गेट ते मेहता धर्मकाटा, मिनीमातानगरपर्यंत ४२ अतिक्रमण हटविण्यात आले.