शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटातील वादामुळे तणाव

By admin | Updated: May 3, 2015 02:05 IST

धार्मिक स्थळाच्या मुद्यावरून दोन समुदायात झालेला वाद सामोपचाराने मिटविण्यात आला.

नागपूर : धार्मिक स्थळाच्या मुद्यावरून दोन समुदायात झालेला वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. परंतु पोलिसांच्या अडेलतट्टूपणामुळे वस्तीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विरोधात प्रियदर्शिनी नगरातील महिला साखळी उपोषणावर बसल्या आहे.त्रिमूर्तीनगर एनआयटी गार्डनमागे प्रियदर्शिनीनगर नगर येथील एनआयटीच्या मालकीच्या परंतु सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर दोन वेगवेगळ्या समाजाचे धार्मिक बांधकाम आहे. एकाचे काम पूर्ण तर दुसऱ्याचे अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या ३५ वर्षात यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. मात्र अर्धवट अवस्थेतील बांधकामावर आक्षेप घेऊन काही लोकांनी पोलीस व नासुप्रकडे तक्रार केली. यावरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईने नागरिक संतापले. त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. यानंतर घटनास्थळासह संपूर्ण वस्तीत पोलीस तैनात करण्यात आले.पोलिसांच्या बळजबरीविरुद्ध आणि नासुप्रच्या पक्षपाती धोरणाचा निषेध म्हणून महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान नगरसेवक आणि काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नगरसेविका उज्ज्वला बनकर यांनी मध्यस्ती केली. दोन्ही गटाच्या लोकांना राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात एकत्र बसवून वाद मिटविण्यात आला. तसे लिहून सुद्धा घेण्यात आले, असे असतानाही पोलिसांनी वस्तीतील बंदोबस्त मागे घेतला नाही. विचारणा केली तेव्हा नासुप्रने तक्रार केल्याचे कारण सांगण्यात आले. येथील नागरिक आणि नगरसेवक नासुप्रमध्ये गेले. नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पोलीस मदतीची आता गरज नसल्याचे लिहून दिले, त्यानंतरही पोलीस हटायला तयार नाहीत. पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली वस्तीतील नागरिकांना एकाप्रकारे वेठीस धरून ठेवले आहे. (प्रतिनिधी)