शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना सूचना ‘आॅल इज वेल’च सांगा !

By admin | Updated: September 5, 2014 01:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून‘नॅक’ समिती (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन काञन्सिल)समोर जास्तीतजास्त चांगले सादरीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

नागपूर विद्यापीठ : ‘आयक्यूएसी’ने केली ‘नॅक’ची उजळणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून‘नॅक’ समिती (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन काञन्सिल)समोर जास्तीतजास्त चांगले सादरीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ही समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यासंदर्भात गुरुवारी ‘आयक्यूएसी’ (इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल)तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची उजळणी तर घेण्यात आलीच, शिवाय समितीसमोर ‘आॅल इज वेल’ असेच सांगा अशा सूचना देण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘नॅक’ समिती १० सप्टेंबर रोजी विद्यापीठाला भेट देणार आहे. यासाठी विद्यापीठात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांना याची रूपरेषा माहिती व्हावी व त्यांना नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यासाठी ‘आयक्यूएसी’ संचालक डॉ. सिद्धार्थ काणे यांनी गुरुनानक भवन येथे ‘कॅम्पस’मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘नॅक’ समिती १२ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधेल. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्तरे द्यावीत. विद्यापीठात काही नकारात्मक बाबी असल्या तरी सकारात्मक बाबींकडे डोळेझाक करणे योग्य ठरणार नाही, असे मत काणे यांनी यावेळी प्रदर्शित केले. (प्रतिनिधी)पालकांना बोलविणारदरम्यान, विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक पदव्युत्तर विभागप्रमुखांना १० विद्यार्थी व पालकांची नावे मागविण्यात आली आहेत. या विद्यार्थी-पालकांना ‘नॅक’सोबत संवाद साधता येणार आहे. विभागप्रमुखांनी धावपळ करून पालकांची नावे प्रशासनाला सादर केली. परंतु अनेक विभागांमध्ये विद्यार्थीच जिथे अनेकदा अनुपस्थित असतात तिथे त्यांच्या पालकांना बोलवणे ही तर परीक्षाच आहे, असे मत एका विभागप्रमुखाने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.