शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

टिप्परच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

हिंगणा : भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक तरुण शिक्षकाचा घटनास्थळीच ...

हिंगणा : भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक तरुण शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा-नागपूर मार्गावरील राजीवनगरात बुधवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

कविलाल गयाराम पटले (वय ३५, रा. लडी लेआऊट, वानाडाेंगरी, ता. हिंगणा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वानाडाेंगरी येथे शिकवणी वर्ग घेत असून, गुड्डू सर नावाने ओळखले जायचे. ते दुपारी दुचाकी (एमएच-४०/एएफ-२५०८)ने वानाडाेंगरीहून नागपूरला जायला निघाले हाेते. दरम्यान, राजीवनगरात विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या टिप्पर (एमएच-३१/एफसी-६२२८)ने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून टिप्परचालक गाेविंद शिवचरण टेंभरे (रा. आर्शीवादनगर, खडगाव, नागपूर) यास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास एमआयडीसी पाेलीस करीत आहेत.