शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांच्या दणक्याने कर विभाग ताळ्यावर

By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST

स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेताच कर विभाग ताळ्यावर आला आहे. आज. बुधवारी

लाखोंच्या मालमत्ता जप्त : दहाही झोनमध्ये कारवाईनागपूर : स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी मंगळवारी मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेताच कर विभाग ताळ्यावर आला आहे. आज. बुधवारी दहाही झोन अंतर्गत कर थकीत असलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. याशिवाय लाखो रुपयांचा थकीत कर वसूल करण्यात आला.बोरकर यांनी अत्यल्प कर वसुलीसाठी उपायुक्त संजय काकडे व कर आणि कर निर्धारक शशिकांत हस्तक यांना जबाबदार ठरविले होते. संबंधित दोन्ही अधिकारी पाच झोनच्या आढावा बैठकीला पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव महापौरांकडे सादर करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर आज कर विभाग एकाएकी सक्रिय झाला. विशेष म्हणजे दहाही झोनमध्ये कर थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विद्याविकास विहार पब्लिक स्कूलकडे २ लाख ४१ हजार २८५ रुपये तर अरुण कलोडे विद्यालय खामला यांच्याकडे ४ लाख ८७ हजार ५४४ रुपये कर थकीत होता. त्यामुळे या दोन्ही शाळांवर जप्ती कारवाई करण्यात आली. धरमपेठ झोनने १५ जणांवर वॉरंट कारवाई करीत १५ लाख ३२ हजार रुपये कर वसूल केला. १४ घरमालकांवर जप्ती करण्यात आली. हनुमाननगर झोनने कारवाई करीत ३५ लाख रुपये कर वसूल केला. नेहरूनगर झोनने जानकीनगर येथील अशोक भागवतकर यांच्याकडे २ लाख ३७ हजार रुपये व जुनी शुक्रवारी येथील नारायण वानखेडे यांच्याकडे २३ हजार रुपये कर थकीत असल्यामुळे जप्ती कारवाई केली. सतरंजीपुरा झोनने शहीम खान यांच्याकडे ५८ हजार कर थकीत असल्यामुळे वॉरंट कारवाई केली. लकडगंज झोनने वॉरंट कारवाई करीत २ लाख रुपये वसूल केले. आशीनगर झोनने शामराव कुंभारे व लक्ष्मीबाई भोटे यांच्याकडे जप्ती कारवाई केली. मंगळवारी झोनने वॉर्ड क्रमांक ५९ मधील रहिवासी चौरे यांच्यावर वॉरंट कारवाई करीत ३० हजार रुपये कर वसूल केला. (प्रतिनिधी)कर भरा, जप्ती टाळानागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला मालमत्ता कर झोन कार्यालयात जमा करावा व मालमत्तेची जप्ती टाळावी, असे आवाहन कर विभागातर्फे करण्यात आले आहे. वॉरंट कारवाई करून मालमत्ता जप्त केल्यानंतरही मुदतीत कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करण्याचा इशारा कर विभागाने दिला आहे.