शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

उद्दिष्ट ठरवून मोहीम राबवा

By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST

प्रत्येक झोनमध्ये सर्वे करून फू टपाथ व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची यादी तयार करा. मंगल कार्यालय व लॉन मालकांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे

आयुक्तांचे निर्देश : अतिक्र मण आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईनागपूर : प्रत्येक झोनमध्ये सर्वे करून फू टपाथ व रस्त्यावरील अतिक्र मणामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांची यादी तयार करा. मंगल कार्यालय व लॉन मालकांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे की नाही याची शहानिश करा. जागा न सोडलेल्या मालकांना नोटीस बजावा. उद्दिष्ट ठरवून अतिक्र मण कारवाई न करणाऱ्या सहायक आयुक्तांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी शनिवारी आढावा बैठकीत दिला.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्धने यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत शहरातील अतिक्र मण कारवाईचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये सहायक आयुक्तांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास कारवाई करू, अशी तंबी वर्धने यांनी दिली.तसेच प्रत्येक झोनधील गॅरेज, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या गाड्या, याची माहिती घेऊन गॅरेज मालकांकडे आस्थापना परवाना नसल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले. बैठकीला उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त भरत तागडे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, नासुप्रचे जनरल मॅनेजर मिलिंदकुमार साळवे, नगररचना विभागाचे सहायक संचालक सतीश रेंगे, अतिक्र मण नियंत्रण अधिकारी दिलीप जामगडे, झोनचे सहाय्यक आयुक्त जी.एम. राठोड, राजेश कराडे, विजय हुमने, सुभाष जयदेव, महेश मोरोणे, राजू भिवगडे, अशोक पाटील, हरीश राऊ त, प्रकाश वराडे, उपविभागीय अभियंता एम.जी.कुकरेजा, सहायक अभियंता के.एस.ईखार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)