शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतच्या भागात टँकरची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या २८ लाखांवर आहे. शहराला दररोज सरासरी ६५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या २८ लाखांवर आहे. शहराला दररोज सरासरी ६५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहरातील प्रति कुटुंबाला ६०० ते ७०० लिटर पाणी पुरवठा होतो. लोकसंख्येचा विचार करता पाणीपुरवठा अधिक असला तरी शहरालगतच्या भागातील वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागते.

भूगर्भातील पाणी पातळीचा विचार करता गेल्या दोन वर्षात चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात पाणी पातळी ०.१३ मीटरने वाढली आहे. नागपूर शहरात ५५५७ बोअरवेल आहेत. परंतु शहरातील नागनदी व पिवळी नदी, पोहरा नदी व नाल्यांमुळे भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे बोरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. परिणामी जलवाहिनीचे नेटवर्क नसलेल्या भागातील नागरिकांना टँकरवर विसंबून राहावे लागते.

.......

१९४ टँकरव्दारे पाणीपुरवठा

नागपूर शहराला दररोज ६५० ते ६७५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येचा विचार करता शहरातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अधिक आहे. असे असतानाही शहरालगतच्या भागात जलवाहिन्यांचे नेटवर्क नसल्याने १९४ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे मनपाला वर्षाला २० ते २५ कोटींचा खर्च करावा लागतो.

...

वर्षानुवर्षे टँकरची प्रतीक्षा

२४ बाय ७ योजनेंतर्गत शहरातील सर्व भागात जलवाहिन्यांचे नेटवर्क टाकण्याचे काम सुरू आहे. शहराच्या बहुसंख्य भागात जलवाहिन्या बदलण्यात आलेल्या आहेत. परंतु शहरालगतच्या दाभा, भांडेवाडी, पारडी, नारा, महेंद्र नगर, भरतवाडा यासह अन्य काही वस्त्यांना अजूनही टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. वर्षानुवर्षे या भागातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत असल्याची व्यथा या भागातील नागरिकांनी मांडली.

.....

बोअरवेल आहे पण वापर नाही

घराचे बांधकाम करताना बोअरवेल वा विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. परंतु भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने नळाच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा होत नसलेल्या वस्त्यात जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील काही वर्षात या भागातील लोकांना पाणीपुरवठा होण्याची आशा आहे.

....

जलपुनर्भरणाला प्रोत्साहन

भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी जलपुनर्भरण होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. शासकीय कार्यालये, बगिचे, शाळा व अन्य इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. नवीन बांधकाम करतानाही ही यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. यासाठी मनपा प्रशासतातर्फे प्रोत्साहन दिले जाते.

मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता

...

शहराची एकूण लोकसंख्या -२८,०००००

दररोज होणारा पाणीपुरवठा -६५०एमएलडी

शहरातील एकूण बोअरवेल -५५५७