शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये सुरक्षेसाठी कडक पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:37 IST

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करावी. या समितीने शाळांची पाहणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे शाळांना निर्देश द्यावे.

ठळक मुद्देभाजपाची मागणी : शिक्षण उपसंचालकांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करावी. या समितीने शाळांची पाहणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे शाळांना निर्देश द्यावे. यानंतरही शाळा उपाय योजत नसतील मान्यता रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे करण्यात आली.काही दिवसांनी पूर्व हरियाणातील रेयान स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागपुरातील पालकांची चिंता वाढली आहे. याची दखल घेत भाजपाचे आ. सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शिक्षण उपसंचालक पारधी यांची भेट घेतली. यावेळी महामंत्री संदीप जोशी, युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवानी दाणी, संघटन मंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते.स्कूल बसचे चालक व वाहक बदलले जात असतील तर त्याची माहिती पालकांना मोबाईलद्वारे दिली जावी. विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास होऊ लागल्यास, दुर्घटना झाल्यास त्यावर त्वरित उपचार करावे.शाळेच्या प्रवेश द्वारावर तक्रार पेटी लावून त्यावर संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिहिला जावा. यासह विविध उपाय महिनाभरात योजण्याचे निर्देश शाळांना द्यावे, अशी मागणी कोहळे यांनी केली. यावेळी शिक्षण उपसंचालक पारधी यांनी शाळांना या संबंधीचे दिशानिर्देश जारी केले जातील, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात देवेन दस्तुरे, प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, भाजयुमोचे शहर महामंत्री जीतू ठाकूर, राहुल खंगार, बालू रारोकर,कमलेश पांडे, नेहल खानोरकर, अक्षय पाटील, सुनील मानेकर, पारेन्द्र पटले, दीपांशु लिंगायत, आलोक पांडेय, वैभव चौधरी, सचिन सावरकर,हितेश घुई आदींचा समावेश होता.शाळांमध्ये ही करा तपासणीशाळेच्या परिसरात व आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत का ?शाळेतील सर्व कर्मचाºयांची पोलीस पडताळणी झाली का ?शाळेतील शौचालय व कॅन्टीन स्वच्छ आहे का ?विद्यार्थिनींसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था आहे का ?स्कूल बसवरील चालक वाहकांची पोलीस पडताळणी झाली आहे का ?