शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दोनशेवर तळीरामांवर कारवाई

By admin | Updated: January 1, 2017 02:54 IST

नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश

नागपूर : नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही तळीरामांवर कुठलाही परिणाम पडल्याचे दिसून आले नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी शहरात राबविलेल्या ‘ड्रंकन ड्राईव्ह’मोहिमेंतर्गत दोनशेवर तळीरामांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेक जण उन्माद घालतात. दारू पिऊन वाहन चालवितात, यातून अपघात घडतात. यावर नियंत्रण राहावे, या उद्देशाने वाहतूक पोलीस विभागातर्फे शनिवारी सायंकाळपासूनच शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. चौकाचौकात पोलीस तैनात होते. ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष आदेश जारी करीत दारू पिऊन वाहन चालवताना कुणी आढळून आल्यास त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतरही तळीरामांवर कुठलाही परिणाम झाला नाही. शहरात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दोनशेवर तळीरामांविरुद्ध कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी) फुटाळा तलावावर श्वान पथक शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर फुटाळा तलाव येथे मोठ्या प्रमाणावर नववर्षासाठी गर्दी होत असल्याने, येथे विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्वान पथक तैनात करण्यात आले होते.