शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

तडिपार हजारे सभागृहात

By admin | Updated: August 18, 2015 03:40 IST

जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार करण्यात आलेला काँग्रेसचा नगरसेवक आणि कुख्यात गुन्हेगार पुरुषोत्तम नागोराव

नागपूर : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडिपार करण्यात आलेला काँग्रेसचा नगरसेवक आणि कुख्यात गुन्हेगार पुरुषोत्तम नागोराव हजारे (वय ३७) सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हजर झाल्यामुळे पालिका वर्तुळात चर्चेचा भूकंप आला. राजकीय वर्तुळात दिवसभर हजारेच चर्चेचा विषय होता. कुख्यात गुंड हजारे पारडी भागाचा नगरसेवक आहे. त्याने कळमन्यात गुन्हेगारांची एक टोळीच तयार केली असून, प्राणघातक हल्ल्यांसह अनेक गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. हजारेचे याच भागातील लांजेवार टोळीसोबत वैमनस्य आहे. त्यांच्यात अनेकदा खटके उडाले. एकमेकांवर हल्ले करणे, अपहरण करणे, मारहाण करणे, धमक्या देणे असेही प्रकार झाले आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वृत्तीत बदल होत नसल्यामुळे कळमना पोलिसांनी हजारेविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार २१ जुलैला या अहवालाला पोलीस आयुक्तालयातून संमती मिळाली. त्यानंतर २५ जुलैला परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्तांनी हजारेंच्या हद्दपारीचा आदेश काढला. पोलिसांच्या परवानगीनेच सभागृहातहजारे याने सभेला हजर राहण्यासाठी पोलीस विभागाकडे रीतसर परवानगी मागितली होती. ज्याने तडिपारीचा आदेश काढला, त्याच अधिकाऱ्याला संबंधित व्यक्तीला विशिष्ट कारणामुळे काही अवधीसाठी प्रतिबंधित ठिकाणी हजर राहाण्याची परवानगी देता येते. हजारे लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक आहे. त्यामुळे आपल्याला सभेला हजर राहणे गरजेचे आहे, असे सांगून त्याने परिमंडळ ३ च्या उपायुक्तांकडून रीतसर परवानगी मिळविली होती.