श्रद्धेय बाबूजी यांना स्वरसुमनांजली : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवारी त्यांना भावपूर्ण स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक नीलेश सावरकर व त्यांच्या सहकारी कलावंतांनी श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत स्वरसुमनांजलीचे सादरीकरण केले. तबलावादक पंकज येळणे आणि मायनरवर कमलेश सावरकर यांनी साथसंगत दिली. कार्यक्रमाची ध्वनिसंयोजन व्यवस्था अशोक दुरुगकर यांची होती. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}