शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या समर्थनार्थ ‘मा.गो.’ आले धावून

By admin | Updated: January 22, 2017 02:21 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे.

गरजूंना आरक्षण मिळते का तपासा ? : देशपातळीवर समिती नेमण्याची मागणी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी ऐन उत्तर प्रदेश निवडणुकांच्या अगोदर टाकलेल्या ‘आरक्षणबॉम्ब’मुळे परत एक राजकीय वाद सुरू झाला आहे. वैद्य यांचे वडील व संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांनी त्यांची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरली आहे. मागासवर्गीय जाती व जमातींमधील अनेक जण अद्यापही गरीब असल्याने त्यांना आरक्षण असायला हवेच. मात्र ‘ओबीसी’ समाजातील खऱ्या गरजूंपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचत आहेत की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशपातळीवर समिती नेमण्याची आवश्यकता असल्याचे मत मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले. आरक्षण पूर्णपणे रद्द करण्याची आवश्यकता असून त्याजागी अशी व्यवस्था लागू करण्यात यावी ज्यात सर्वांना समान संधी आणि शिक्षण मिळेल, असे वक्तव्य डॉ.मनमोहन वैद्य यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ‘यू टर्न’ घेत संघ आरक्षणाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले होते. यावरून देशभरातील विविध राजकीय पक्षांकडून टीका सुरू झाली तर भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. संघाने व्यक्त केली नाराजी दरम्यान, मा.गो. वैद्य यांच्या मागणीसंदर्भात संघाने मात्र ‘दक्ष’ पवित्रा घेतला आहे. संबंधित वक्तव्य हे मा.गो. वैद्य यांचे वैयक्तिक मत आहे. संघ त्या मताशी सहमत नाही. आरक्षण सुरूच राहायला हवे व त्याची अंमलबजावणी पूर्णपणे व्हायलाच हवी, असे संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी स्पष्ट केले. संघ आरक्षणविरोधी असल्याचे चित्र उभे केले जात आहे. याची आम्ही निंदा करतो, असेदेखील ते म्हणाले.