शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या भरवशावर सुपरची रुग्णसेवा

By admin | Updated: December 6, 2015 03:18 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

१७ वर्षांपासून निवासी डॉक्टरांची पदेच नाहीत : रुग्णालयाला ८६ डॉक्टरांची प्रतीक्षानागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु येथे १७ वर्षांपासून रुग्णालयाचा कणा असलेले निवासी डॉक्टरांची पदेच मंजूर नाहीत. हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर निघून गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी परिचारिकांवर येते. सुटीच्या दिवशी, रात्रीच्यावेळी रुग्ण अडचणीत येतात. असे असतानाही प्रशासन डॉक्टरांच्या पद भरतीकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१२ मध्ये डी.एम.कार्डिओलॉजी व डी.एम.गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हे अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले. तसेच विविध विषयांमध्ये डी.एम. व एम.सीएच हे अभ्यासक्रम सुरू करावयाचे असल्याने कनिष्ठ निवासी डॉक्टरांची ३९ तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांची ४७ अशा एकूण ८६ पदांचा प्रस्ताव २०१२ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला पाठविण्यात आला. परंतु अद्यापही या पदांना मंजुरी मिळालेली नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ १९९८साली तयार झाले. सध्याच्या स्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी या सात विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. गेल्या दोन वर्षात २५ हजार ९७६ रुग्णाची वाढ झाली आहे. तसेच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५ हजार ५१२ रुग्ण भरती होते. गेल्या वर्षी १ हजार ५५१ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या ७ हजार ६३वर गेली आहे. रुग्णालयात रोज १५ वर अ‍ॅन्जिओग्राफी, पाचवर अ‍ॅन्जिओप्लास्टी, दोन हृदयशल्यक्रियासह दोन न्युरो सर्जरी होतात. या शिवाय बहुसंख्य वॉर्डाच्या खाटा गंभीर रुग्णाने फुल्ल असतात. यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी २४ तास डॉक्टरांची गरज असते. परंतु सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेनंतर डॉक्टरच राहत नसल्याने अनेकवेळा रुग्णाच्या जीवावर बेतते. अशी बिकट स्थिती असतानाही शासनाचे याकडे लक्ष नाही. धक्कादायक म्हणजे, गेल्या महिन्यात साप चावलेल्या एक ३५ वर्षीय महिलेला सुपरमध्ये हिमोडायलिसीस करायचे होते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरच नसल्याने त्या महिलेवर वेळेवर हिमोडायलिसीस होऊच शकले नाही. परिणामी त्या महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी अशा घटना झाल्याचे सांगण्यात येते.(प्रतिनिधी)