शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

सुनीलला हवाय मदतीचा हात

By admin | Updated: June 17, 2014 00:48 IST

बालपणीच त्याने पोलीस बनण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्याची तयारीही सुरूच होती. ६ जूनला एसआरपीएफची भरती हिंगण्यात होती. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत,

पोलीस भरती जीवावर बेतली : आॅरेंज सिटीत उपचार सुरू नागपूर : बालपणीच त्याने पोलीस बनण्याचे स्वप्न बघितले होते. त्यासाठी त्याची तयारीही सुरूच होती. ६ जूनला एसआरपीएफची भरती हिंगण्यात होती. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत, त्यातच कुटुंबाचा भार, मोठी उमेद घेऊन तो भरती प्रक्रियेत सहभागी झाला. आणि धावण्याच्या परीक्षेत अचानक भोवळ येऊन पडला. लागलीच त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर लिव्हर, किडनी निकामी झाल्याचे सांगितले. त्याच्या उपचारावर चार लाखाचा खर्च होणार असल्याचे सांगितल्याने, कुटुंबीयांचे हातपायच गळाले. घरची शेती गहाण ठेवून आलेल्या पैशातून त्याच्यावर आॅरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पीडित तरुणाचे नाव आहे, सुनील येळे. सांगली जिल्ह्यातील घाणंद तालुक्याच्या आटपाडी गावच्या सुनीलची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडिलांचा आधार हरविला आहे. तीन भाऊ असून मोठा मजुरी करून कुटुंबाला हातभार लावतो आहे. मधला सुनील टेलरींग करून पोटापाण्याची गरज भागवितो. त्याचे लग्न होऊन अवघे सहा महिने झाले आहे. कसेबसे त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पोलीस बनल्यावर दिवस पालटतील, या अपेक्षेने त्याचे प्रयत्न सुरू होते. तीन ते चार वेळा पोलीस भरतीमध्ये सहभागीही झाला. मात्र अपयश आले. नागपुरात हिगणा येथे एसआरपीएफची भरती असल्याचे सुनीलला समजले. ५ जुनला तो सांगलीहून नागपूरकडे निघाला. रात्रभराचा प्रवास करून हिंगण्यात पोहचला. भरतीत सहभागी झाला. १०० मीटर धावणी, लांब उडीत गुणवत्ता मिळविली. मात्र पाच किलोमीटरची धावणी परीक्षा त्याच्यावर चांगलीच बेतली. एक किलोमीटरचा एक राऊंड त्याने पूर्ण केला. आणि अचानकच भोवळ येऊन तो पडला. लगेच पोलिसांनी त्याला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला आॅरेंज सिटी रुग्णालयात हलविण्यात आले. धावताना त्याला रक्ताची उलटी आली. मात्र ती बाहेर न पडता श्वासनलिकेत गेली, तो कोमात गेला. सध्या सुनील शुद्धीवर आला आहे. परंतु अजूनही त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्याच्यावर दररोज डायलिसीस करण्यात येते. यासाठी दररोज २५ हजार रुपये लागत आहे. भावाजवळचे पैसे संपले आहे. १.२० लाख रुपये दवाखान्याचे बिल थकले आहे. पैसे नसल्यामुळे डॉक्टरांनी उपचार थांबविला आहे. (प्रतिनिधी)दान दात्यांकडून हवाय मदतीचा हात -एसआरपीएफच्या कमांडंटनी पुढाकार घेऊन, थोडीफार मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आर. आर. पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही यश आलेले नाही. शेती गहाण ठेवून होते तेवढे दिले, आता पैसेच नसल्याने भाऊ हतबल, लाचार झाला आहे. अशावेळी त्याला समाजातील दात्यांची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनी सुनीलला मदत करायची असेल, बँक आॅफ इंडियाच्या १६०२१०११००००६२७ या खाते क्रमांकावर मदत पाठवू शकतात. अथवा ९९२११६३२६४ व ८२७५२६६५१२ या क्रमांकावर संपर्क करू शकता.