शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या ‘पेन्शन’वर साडेतीन कोटींचा खर्च

By admin | Updated: April 9, 2017 02:10 IST

आमदार-खासदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन सुरू होते. मागील एप्रिलपासून ११ महिन्यांत नागपुरातील

११ महिन्यांची आकडेवारी : ‘पेन्शनर्स’ला ८७६ कोटींचा निधी प्रदान नागपूर : आमदार-खासदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन सुरू होते. मागील एप्रिलपासून ११ महिन्यांत नागपुरातील विविध राजकीय नेत्यांच्या निवृत्ती वेतनावर साडेतीन कोटी रुपये खर्च झाले. प्रत्येकाला प्रतिमहिना सरासरी ४५ हजारांहून अधिक रक्कम प्राप्त झाली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर कोषागार कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत किती निवृत्ती वेतनाधरकांना किती रक्कम प्रदान करण्यात आली, यात राजकीय नेत्यांची संख्या किती होती, या कालावधीत किती नवीन निवृत्ती वेतनधारक आले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या कालावधीत प्रत्येक महिन्यात सरासरी ७० नेत्यांना निवृत्ती वेतन देण्यात आले. देयकांनुसार दर महिन्यात आकडा बदलला व ११ महिन्यांत ७७० देयकांचे निवृत्ती वेतन काढण्यात आले. निवृत्ती वेतनाचा एकूण आकडा ३ कोटी ४९ लाख ६५ हजार ४१९ इतका होता. दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन प्रदान करण्यात येते, अशी माहितीदेखील मिळाली.(प्रतिनिधी) इतरांना सरासरी १५ हजार निवृत्ती वेतन कोषागार कार्यालयाकडे ११ महिन्यांत ५ लाख ६४ हजार ३१३ निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनासंदर्भातील देयके आली. या देयकांपोटी कार्यालयातर्फे ८७६ कोटी ७८ लाख ६० हजार ३११ रुपये प्रदान करण्यात आले. सरासरी प्रत्येक निवृत्ती वेतनाधारकाला प्रतिमहिना १५ हजार ५३७ रुपये मिळाले. राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्ती वेतन कोषागार कार्यालयातर्फे प्रदान करण्यात येते. १ एप्रिल २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत २४७१ नवीन निवृत्ती वेतनधारक समाविष्ट झाले.