शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या

By admin | Updated: December 4, 2015 03:17 IST

मध्यरात्री पत्नीला फोन करून एका फौजदाराने (एएसआय) तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी केला पत्नीला फोन : दारूने केला घात, पोलीस दलात खळबळ नागपूर : मध्यरात्री पत्नीला फोन करून एका फौजदाराने (एएसआय) तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. ज्ञानेश्वर नामदेवराव इंगोले (वय ५५) असे मृत एएसआयचे नाव आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस नागपुरात येत असताना ही घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.इंगोले सक्करदरा पोलीस ठाण्यात दीड वर्षांपासून कार्यरत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. स्वभावही तापट होता. न्यू डायमंडनगर खरबी येथे ते राहत होते. बुधवारी रात्री १० वाजता ते कर्तव्यावरून घरी परतले. जेवण केल्यानंतर बरळत असल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी टोकले. दारूच्या व्यसनामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. यावरून त्यांचा घरच्यांसोबत वाद झाला. रागाच्या भरात इंगोले आपल्या पॅशन मोटरसायकलने घरून निघून गेले. मध्यरात्री त्यांनी पत्नीला फोन केला. ‘सक्करदरा तलावात उडी घेणार आहो’, असे सांगितले. पत्नीने त्यांची समजूत काढून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता फोन कापला. दरम्यान, इंगोले यांच्या फोनमुळे हादरलेली त्यांची मुली, पत्नी, भाऊ आणि शेजारी तसेच सक्करदरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावले. तलावाजवळ त्यांची मोटरसायकल आढळल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेपर्यंत तलावात शोध घेण्याचे प्रयत्न केले, मात्र काहीही आढळले नाही. त्यामुळे इंगोले यांनी रागाच्या भरात फोन केला असावा आणि ते कुठे निघून गेले असावे, असा अंदाज काढून इंगोले यांचे कुटुंबीय आणि पोलीस परत गेले. (प्रतिनिधी) मानसिक स्थिती बिघडल्यामुळे...!गुरुवारी दुपारी २ वाजता सक्करदरा तलावात इंगोले यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी इंगोले यांचा मृतदेह बाहेर काढून कपडे तपासले. त्यांच्याजवळ एक ‘सुसाईड नोट’ आढळली. आपली मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे आत्महत्या करीत आहो. कुटुंबातील सदस्य अथवा अन्य कुणी जबाबदार नसल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. दरम्यान, इंगोले यांच्या आत्महत्येची वार्ता कळताच शहर पोलीस दलात खळबळ उडाली. सक्करदऱ्याचे पीएसआय नीलेश पुरभे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.