शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: June 9, 2017 16:11 IST

वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.

आॅनलाईन लोकमतअमरावती: वरूड नजीकच्या कुरळी येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी ९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या शेतकऱ्यावर तीन लाखांचे खासगी कर्ज होते. मशागतीसाठी आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे चिंताग्रस्त स्थितीत या शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ृ शरद शंकरराव कुकडे (रा. कुरळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याकडे तीन भाऊ मिळवून ५ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळेत्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. उत्पन्न नसल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. खरीप हंगाम तोंडावर असूनही मशागतीसाठी पैसा नव्हता. त्यात कर्जवसुलीसाठी सतत तगादा सुरू असल्याने अखेर राहत्या घरातच शरद कुकडे यांनी गळफास घेऊन त्यांची जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. वरूड पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा नोंदविला.