शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या विरहात भावी अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अपार कष्ट उपसून आईने वाढविले. आपण चांगल्या पदावर नोकरी करून तिला सुखाचे दिवस दाखवू, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अपार कष्ट उपसून आईने वाढविले. आपण चांगल्या पदावर नोकरी करून तिला सुखाचे दिवस दाखवू, असे तिचे स्वप्न होते. ते पूर्ण करू शकलो नाही. आई कायमची निघून गेली, हे शल्य त्याला कमालीचे अस्वस्थ करू लागले अन् एका भावी अभियंत्याने आईच्या विरहात गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोशन सुनील जारोडे (वय २३) असे त्याचे नाव आहे. तो साईनगरात राहत होता. दीड महिन्याचा असताना रोशन आणि त्याच्या आईला वाऱ्यावर सोडून त्याचे वडील निघून गेले. त्याही अवस्थेत न डगमगता मिळेल ते काम करून आईने रोशनला वाढवले. त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी रोशनची आई मेस चालवत होती. भल्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कष्ट करत होती. रोशनचे शिक्षण पूर्ण झाल्याने आता तो अभियंता होईल, आपल्याला सुखाचे दिवस येतील, असे स्वप्नी ती बघत होती. मात्र, कोरोनाने घात केला. दीड महिन्यापूर्वी कोरोनाने रोशनच्या आईला हिरावून नेले. तेव्हापासून रोशन कमालीचा अस्वस्थ झाला होता. आईच्या विरहाने कासावीस झालेल्या रोशनने रविवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. शिवाजी श्रीराम शेमके (वय ६०) यांनी दिलेल्या सूचनेनंतर एमआयडीसी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मृतदेह मेडिकलला पाठविला.

---