शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

उसाची ओव्हरलोड वाहतूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना ...

रेवराल : ऊस गाळपाचा हंगाम सध्या सुरू आहे. मौदा तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ जास्त नाही. मात्र, बाबदेव येथे साखर कारखाना असल्याने येथे जिल्ह्यातून ऊस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रॅक्टरद्वारे येथे ऊस आणला जातो. पण, या ट्रॅक्टरच्या माध्यमातून उसाची ओव्हरलोड वाहतूक केली जात असल्याने या परिसरात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऊस वाहतूक करताना वाहतूकदारांना उसाच्या वजनाप्रमाणे वाहतुकीचे भाडे मिळते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकांकडून वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ऊस वाहतुकीची चढाओढ

उसाच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलीत साधारण २० ते २५ टनापर्यंत ऊस भरण्याची क्षमता असते. ट्रॅक्टर मालक कमी वेळात जास्त टन वाहतूक करण्याच्या लालसेने दुप्पट म्हणजे ४० टनाच्या पुढे ऊस भरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ट्रॉली पलटी झाल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ट्रॉली पलटल्यानंतर ती पुन्हा भरण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. तो भुर्दंड शेतकऱ्यांना सोसासा लागतो.

अल्पवयीन चालक

ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक करणारे अनेक चालक अल्पवयीन आहेत. त्यात काही मद्यपान करून आणि मोठ्या आवाजात ट्रक्टरमध्ये गाणी लावून वाहने चालवितात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांकडून यावर नियंत्रण हवे, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.

-

बाबदेव येथील साखर कारखाना सुरू असून, या ठिकाणी मौदा तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊस विक्रीला आणतात. पण, ट्रॅक्टर चालक एका ट्रॉलीला दुसरी ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करतात. ही ओव्हरलोड वाहतूक भंडारा - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी लक्ष देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी.

- शिवा आकरे, जिल्हा संघटक, मनसे