शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

उपराजधानी भूकंपाच्या धोक्याबाहेर नाही

By admin | Updated: May 15, 2015 02:46 IST

उपराजधानी ही भूकंपाच्या धोक्याबाहेर आहे, असे म्हणणे चुकीचे होईल. कारण भूकंपाचा धोका नागपूरपासून केवळ १६० कि.मी. अंतरावर आहे.

वसीम कुरैशी  नागपूर उपराजधानी ही भूकंपाच्या धोक्याबाहेर आहे, असे म्हणणे चुकीचे होईल. कारण भूकंपाचा धोका नागपूरपासून केवळ १६० कि.मी. अंतरावर आहे. जबलपूर व नर्मदा घाटीजवळून फाल्ट लाईन गेली आहे. ‘सिस्मिक मॅप’मध्ये याला प्रिन्सिपल डीप सिटेड फाल्ट दर्शविण्यात आला आहे. नागपूरहून एक हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भूकंपामुळे नागपुरातही धक्के जाणवले होते. यापूर्वी १९९७ मध्ये जबलपूरमध्ये आलेला ( ६.० रिश्टर) तर लातूरमध्ये १९९३ मध्ये आलेला ( ६.२ रिश्टर) भूकंपामध्येही नागपूरला धक्के बसले होते. उपराजधानीला बसलेले हे धक्के सावधगिरी बाळगण्याचे संकेत देत आहेत. फाल्ट लाईन अगदी जवळ असल्याने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणातील संबंधित अधिकाऱ्यांनुसार मात्र उपराजधानीजवळ कुठलीही फाल्ट लाईन नाही. परंतु राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालया( एनसीडीसी)जवळ असलेल्या जीएसआयच्या सिस्मिक मॅपमध्ये फाल्ट लाईन स्पष्टपणे दिसून येते. नेपाळमध्ये आलेला भूकंप संबंधित एजन्सींसाठी एक संकेत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालय यासंबंधात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याची तयारी करीत आहे. एनसीडीसीचे डायरेक्टर जी.एस. सैनी यांच्यानुसार नागपूरला भूकंपाच्या धोक्याबाहेर समजणे योग्य होणार नाही. फाल्ट लाईन जवळूनच गेली आहे. भूकंपासंबंधात करण्यात येणाऱ्या मायक्रो जोनेशनच्या कामात किती धोके असू शकतात. तीव्रता आणि कमकुवतपणाचा अंदाज बांधणे आणि नागरिकांना कशाप्रकारे जागरूक करून यात सहभागी करून घेण्यात यावे. एनसीडीसी नागरिकांना जागरूक करण्यासाठी पुढाकार घेत आहे. सैनी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नॅशनल बिल्डिंग कोडचे नियम लागू करण्यात आले आहेत. परंतु इमारतींच्या बांधकामात अर्थक्वेक रेजिसस्टेन्स रजिस्ट्रेशनवर विशेष भर दिला जात नाही. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित संस्था नैसर्गिक आपत्तीनंतर बांधकामामध्ये अनेक प्रकारच्या तपासणीला आवश्यक असल्याचे सांगत आहेत. परंतु महापालिकेत जुन्या इमारतींची तपासणी आणि नवीन इमारतींच्या बांधकामाबाबत गंभीरतेचा अभाव दिसून येत आहे. चार वर्षांपूर्वी कळमना येथील ‘कोल्ड स्टोरेज’ची इमारत कोसळल्याच्या घटनेने अनेक तथ्य उघडकीस आणले होते. प्रशिक्षणात अनेक नवीन प्रकार विकास कामे व विस्तार आणि तंत्रज्ञानात बदल होत असतांनाच आपत्ती व्यवस्थापनातही अनेक नवीन प्रकार आले आहेत. एनसीडीसीने आपल्या प्रशिक्षणात न्युक्लियर बायोलॉजिकल केमिकल संबंधी गाईडलाईन, मॅनेजमेंट आॅफ मीडिया, मास कॅज्युअल्टीसह अनेक नवीन गोष्टींना सामील केले आहे. एनसीडीसी परिसरातील परिवहन क्षेत्रातील अपघातांदरम्यान योग्य पद्धतीने मदत कार्य करता यावे , यासाठी रेल्वेचे डबे आणि हेलिकॉप्टरलाही सामील करून घेण्यात आले आहे. नागपुरात प्रशिक्षण घेतलेली चमू नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी नागपुरातील एनसीडीसीमधून प्रशिक्षण घेणारे अहमदाबादचे चार अधिकारी नेपाळमध्ये मदत कार्य करून परतले आहेत. या फायर फायटर्सचे टीम लीडर हितेश पटेल (अहमदाबाद) यांच्याशी लोकमतने फोनवरून संवाद साधला. त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये आलेल्या भूकंपाच्या तुलनेत नेपाळमध्ये अधिक नुकसान झाले. नंतरही आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे जीवहानी अधिक झाली. तिथे मदत कार्य करतांना अनेक नवीन गोष्टी समोर आल्या.