नागपूर : उपराजधानीत ‘चक्काचोर टोळी’ सक्रिय झाली असून उभ्या वाहनाचे अख्खे चाकच चोरटे काढून नेत आहे. उपराजधानीतील विविध भागात एकाच दिवशी अशाप्रकारच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मल्लिका लांजे या छाप्रूनगरातील (लकडगंज) जीवनदीप अपार्टमेंटमध्ये राहतात. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली ह्युंडई आय १० कार (एमएच ३६ / एच ८९६०) निवासस्थानाच्या परिसरात ठेवली होती. या कारचे टायर-ट्यूबसह अख्खे चाकच चोरीला गेले. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर मल्लिका लकडगंज पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्या. तेथे त्यांना दुसरा धक्का बसला. शांतिनगर जुना बगडगंज येथील रहिवासी गुलाबचंद सुराणा याच्या ह्युंडई आय २० ग्रॅन्ड कारची ( एमएच ४९/यू ४११५) चक्क तीन चाके चोरट्यांनी लंपास केली होती. त्यामुळे सुराणा देखील ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आले होते. तिसरी घटना अमरावती रोड भरतनगर येथे घडली. येथील दर्शना निंभोरकर यांच्या ह्युंडई आय १० कार (एमएच २७/बीई ३२७१)ची दोन चाके चोरट्यांनी लंपास केली.
उपराजधानीत ‘चक्का’ चोरी
By admin | Updated: November 25, 2015 06:56 IST