शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत पाणीटंचाई

By admin | Updated: February 26, 2015 02:14 IST

पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे.

नागपूर : पेंच प्रकल्पापासून २३ कि.मी. अंतरावरील वाकी परिसरातील गोसेवाडी येथे उजव्या कालव्याचा १०० फूट भाग वाहून गेला आहे. यामुळे शेती व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच दुरुस्तीसाठी ७२ तासांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे शहरातील पश्चिम व दक्षिण भागाला तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. मोजकेच पाणी मिळणार असल्याने लोकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा वाकी परिसरातील गोसेवाडी येथे फुटला आहे. कालव्यातून ५७५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. या कालव्याव्दारे नागपूर शहरासोबतच खापरखेडा व कोराडी वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास कालव्याला छिद्र पडले. शेतकऱ्यांनी याची माहिती पेंच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. दुपारी १२ वाजता पेंच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परंतु २३ कि.मी. अंतर पार करण्याला बराच कालावधी लागला. त्याुमळे दुपारी ३ च्या सुमारास कालव्याला मोठे भगदाड पडले. यात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरल्याने पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी तामसवाडी कालव्यात पाणी सोडण्यात आले. पेंच कालव्याची अवस्था दयनीय आहे. पेंच टप्पा -४ च काम मागील सहा वर्षापासून सुरु आहे. ३१ मार्च २०१२ पर्यत काम पूर्ण होऊ न पाणी पुरवठा सुरु होणे अपेक्षित होते. ते निर्धारित कालावधीत न झाल्याने पाणी पुरवठा सुरू ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुुरुस्तीला वेळ मिळाला नसल्याची माहिती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)तीन दिवस बसणार फटका कालवा फुटल्याने पेंच प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला दुपारनंतर कालव्यात महादुला पंपिंग स्टेशनमधून गोरेवाडा तलावात पंप करण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक राहणार नाही. या तलावाची सध्याची पातळी ३१५ मीटर इतकी आहे. पुढील ३ दिवसात ती ११४ .३ इतकी घटण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम पेंच प्रकल्पातील शुद्धीकरण केंद्रावर होणार आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारी ते १ मार्चला सकाळपर्यत पश्चिम व दक्षिण नागपुरातील वस्त्यांना मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली आहे.शेती व पिकाचे नुकसानइतक्या मोठ्या प्रमाणात कालवा फुटण्याची ही पहिलीच घटना आहे. पाण्याच्या प्रवाहात १०० फुटाचा भाग वाहून गेला. कालव्याचे आजूबाजूच्या शेतात शिरल्याने शेतीसोबतच पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कालव्याजवळील शेती खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.