शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या सुविधेपेक्षा विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST

नागपूर : शिक्षकांच्या सुविधेपेक्षा आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात ...

नागपूर : शिक्षकांच्या सुविधेपेक्षा आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात स्पष्ट करून बदलीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका खारीज केली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला़

नागपूर येथील सहायक शिक्षिका मीना मोठारकर यांची चांदूर रेल्वे येथून आदिवासी क्षेत्रातील सदराबादी येथील शाळेत बदली करण्यात आली आहे. त्यावर मोठारकर यांचा आक्षेप हाेता. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. कायद्यानुसार, आदिवासी क्षेत्रातल्या शाळेतील रिक्त पदे प्राधान्यक्रमाने भरणे बंधनकारक आहे. सदराबादी येथील शाळेत ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत असून, तेथील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे पद रिक्त हाेते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हे पद तातडीने भरणे आवश्यक हाेते. त्यामुळे मोठारकर यांची तेथे बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीमुळे कोणत्याही नियमांचा भंग झाला नाही, असे न्यायालयाने या निर्णयात नमूद केले़

--------------

तो दावा फेटाळला

१५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार महिला शिक्षिकेची आदिवासी क्षेत्रात बदली करता येत नाही, हा मोठारकर यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला़ सदर निर्णयानुसार महिला शिक्षिकेची दुर्गम भागात बदली करता येत नाही. सदराबादी हे ठिकाण दुर्गम भागात असल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही, असे न्यायालयाने सांगितले़

------

अंतरिम दिलासा दिला होता

२७ ऑगस्ट २०२० रोजी उच्च न्यायालयाने नवजात बाळामुळे बदली आदेशावर अंतरिम स्थगिती देऊन मोठारकर यांना दिलासा दिला हाेता. त्यानंतर दीर्घ कालावधी लोटला असल्यामुळे त्या आता नोकरीवर रुजू होऊन बाळाचीही योग्य काळजी घेऊ शकतात, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.