शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संपाचे सावट

By admin | Updated: September 2, 2016 02:52 IST

सरकारद्वारे कामगार कायद्यात सोयीनुसार करण्यात येत असलेल्या बदलांच्या विरोधात तसेच अन्य १२ प्रमुख

११ कर्मचारी संघटनांनी केले आवाहन : कामगार विरोधी धोरणाचा विरोधनागपूर : सरकारद्वारे कामगार कायद्यात सोयीनुसार करण्यात येत असलेल्या बदलांच्या विरोधात तसेच अन्य १२ प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. यात केंद्र बरोबरच राज्याचे कर्मचारीही सहभागी होणार आहे. नागपुरात जवळपास १५० केंद्रीय कार्यालय आहेत. त्याचबरोबर बँक, रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या देशव्यापी संपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात नागपुरातही दिसणार आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण उद्योजकांच्या हिताचे असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. या संपात संघटित क्षेत्राबरोबरच असंघटित क्षेत्रातील कामगारांचाही समावेश आहे. कामगार कायद्यात होत असलेल्या बदलावर अंकुश लावण्याचा संपाचा उद्देश आहे. देशातील कामगार कायद्यामुळे विदेशी कंपन्या देशात गुंतवणूक करण्यास माघार घेत आहे. त्यामुळे सरकार कामगार कायद्यात बदल करण्यासंदर्भात विधेयक मांडणार आहे. यात औद्योगिक विवाद अधिनियम १९४७, ठेका मजूर कायदा १९७१, ट्रेड युनियन कायदा १९२६, औद्योगिक रोजगार कायदा १९४६, किमान वेतन कायदा, अप्रेंटिसशीप कायद्यासह ४४ कामगार कायद्यात संशोधनासह अन्य प्रस्ताव विधेयकात आहे. कर्मचारी संघटनांच्या मते या बदलानंतर कामगारांचे हक्क प्रभावित होणार आहेत. ३०० कर्मचारी संख्या असणारी कंपनी सहज कर्मचाऱ्यांना काढू शकणार आहे. त्यासाठी सरकारी परवानगीची गरज राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये किमान वेतनाची अट शिथिल झाल्यास कामगारांचे नुकसान होणार आहे. कामगार कायद्यातील नवीन बदल कामगार संघटनांचे अस्तित्व नाकारणारे आहेत. नवीन प्रस्तावित विधेयकात संघटन बनविण्यासाठी ७ ऐवजी १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता राहणार आहे. त्याचबरोबर कायद्यात बदल झाल्यानंतर बालकामगारांचे नियोजन, कामाचे तास, साप्ताहिक सुटी, ओव्हरटाईम, सामाजिक सुरक्षा यासह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधेपासूनही वंचित रहावे लागणार असल्याची चिंता संघटनांना भेडसावत आहे. त्यामुळे एक आक्रमक आंदोलन तयार करण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला आहे. संपात कास्ट्राईबचा सहभाग नाहीसरकारचे कामगारविरोधी धोरण व खासगीकरण धोरणाविरुद्ध काही ‘ट्रेड युनियन’ने संपाची घोषणा केली आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. परंतु या संपात कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटना सहभागी होणार नाही, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे व सचिव नरेंद्र धनविजय यांनी दिली आहे. संघटनेच्या मते कामगार क्षेत्र व खासगीकरणाशी राज्य व जि.प. कर्मचारी संघटनांचा संबंध नाही, शिवाय संप पुकारताना सर्वांना विश्वासात घेण्यात आले नाही, मागासवर्गीयांच्या एकाही मागणीचा यात समावेश नाही. त्यामळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील ५ लाख, नागपूर जिल्ह्यातील १० हजार व जिल्हा परिषदेकडील ३५०० हजार कर्मचारी संपात सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. परंतु संपकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा घोषित केला आहे. (प्रतिनिधी)