शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मनपात काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे ...

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला दिल्लीतून पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेतही स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेशी महाविकास आघाडी न करता संपूर्ण जागांवर काँग्रेस लढली, तर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, अशी भूमिका शहर काँग्रेसने पूर्वीच घेतली आहे. महापालिकेत

राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेची आघाडी करू नये, अशा मागणीचा ठराव दीड वर्षापूर्वी शहर काँग्रेसच्या बैठकीत संमत करण्यात आला होता. पुढे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे शहर काँग्रेसच्या भूमिकेला बळ मिळाले. आता पटोले यांना दिल्लीतून पाठबळ मिळाल्यामुळे नागपूर महापालिकेत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेसला आघाडी का नको ?

- आघाडीबाबात चर्चा करताना राष्ट्रवादी अस्वास्तव जागांची मागणी करते.

- काँग्रेस १०० टक्के जिंकेल, अशा जागांसाठी राष्ट्रवादी अडून बसते.

- या वाटाघाटीत निवडणुकीच्या काळातील महत्त्वाचा वेळ वाया जातो. फलित काहीच होत नाही.

- लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत नागपुरात काँग्रेसची मते वाढतच गेली आहेत.

- राष्ट्रवादीची शहरात फारशी ताकद नाही. एकच नगरसेवक तोही स्वब‌ावर निवडणूक आला.

- आघाडीत शिवसेनेलाही जागा सोडाव्या लागतील. काँग्रेसच्या तेवढ्या जागा लढण्यापूर्वीच कमी होतील.

- तशीही नागपुरात शिवसेना ही भाजपची मते कमी करते. त्यामुळे सोबत लढून काँग्रेसचा फायदा नाही.

काँग्रेसला उसणवारीवर उमेदवार घ्यावे लागत नाही.

- काँग्रेसच्या विचारांचे मतदार शहरातील प्रत्येक बूथवर आहेत. मित्रपक्षांसाठी ५० जागा सोडल्या तर त्या ठिकाणी पंजा चिन्ह संपेल. असे करून काँग्रेसच्या मतदाराला आपण दुसऱ्या चिन्हावर मत देण्यासाठी बाध्य करीत आहोत. काँग्रेसकडे एका वॉर्डासाठी १० ते १५ तगडे उमेदवार तिकीट मागतात. स्पर्धा एवढी असते की कुणाला तिकीट द्यावी? असा प्रश्न पडतो. आम्हाला उमेदवार उसणवारीवर घ्यावे लागत नाही. त्यामुळे पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.

- आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस