शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा ‘स्ट्रॅटेजिक’ बंदोबस्त

By admin | Updated: July 31, 2015 02:50 IST

विविध समाजातील प्रतिष्ठित लोकांशी समन्वय साधून पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले.

नागपूर : विविध समाजातील प्रतिष्ठित लोकांशी समन्वय साधून पोलिसांनी त्यांना विश्वासात घेतले. तसेच समाजकंटकांना पद्धतशीरपणे संदेश पोहोचवण्यात आला. त्यामुळे संवेदनशील वस्त्यांमध्ये सुद्धा कोणताही गैरप्रकार झाला नाही. इतकेच नव्हे तर ज्या कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली त्या कारागृहाच्या परिसरातच ‘मॉर्निंग वॉक’ करणारे बिनधास्त फिरत होते. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जी ‘स्ट्रॅटेजी’ अवलंबिली होती, ती यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याकूब मेमन याच्या फाशीच्या प्रकरणाकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. यातच कायद्यातील तांत्रिक गुंतागुंत आणि क्षणाक्षणाला बदलत असलेला घटनाक्रम यामुळे हे प्रकरण आणखीनच ताणून धरले होते. तेव्हा याकूबला फाशी होते किंवा नाही अशा दोन्ही परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता होती.याकूबला नागपुरात फाशी दिली जाणार याची माहिती १५ दिवसांपूर्वीच बाहेर उघडकीस आली होती. त्यामुळे या प्रकरणावर चांगलीच चर्चा घडून येऊ लागली. फाशीचा विरोध करणारे आणि समर्थन करणारे असे दोन गट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच सुरुवातीला केवळ नागपूर शहरापूरता घोषित ‘रेड अलर्ट’ हा बदलत्या घटनाक्रमानंतर संपूर्ण देशभरासाठी लागू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जी व्यूहरचना आखली ती पूर्णत: यशस्वी ठरली.पोलिसांनी शहरातील जवळपास सर्वच संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काही रस्त्यांवर नाकेबंदीसुद्धा करण्यात आली होती. परंतु या नाकेबंदीदरम्यान सामान्य माणसाला कुठलाही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. (प्रतिनिधी)