शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या मनावर थराराचा शहार

By admin | Updated: December 18, 2014 02:42 IST

सर्वच शाळांमध्ये पेशावरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यार्थी एकत्रित झाले होते.

नागपूर : सर्वच शाळांमध्ये पेशावरच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यार्थी एकत्रित झाले होते. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे जाणवित होती. कुणाशीही वैर नसणाऱ्या आणि दहशतवाद म्हणजे काय? याचाही अर्थ माहिती नसणाऱ्या निरागस चिमुकल्यांवर गोळीबार करणारे दहशतवादी माणसे असूच शकत नाही. जगातल्या कुठल्याच धर्माची ही शिकवण नाही, असा विचार व्यक्त करताना जगभरात होत असलेल्या दहशतवादी कृत्यांनी विद्यार्थी भेदरलेले दिसले. प्रत्येक शाळेतले वातावरण सुन्न आणि खिन्नतेने व्यापलेले होते. बऱ्याच शाळांमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि खेळांचा सराव सुरु होता पण आज अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला नाही. वृत्तपत्रातल्या बातम्या आणि छायाचित्रे पाहून मुलांचे डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी)मोमीनपुरा, हसनबागेत विद्यार्थ्यांची श्रद्धांजली पाकिस्तानच्या पेशावर येथील आर्मी शाळेत दहशतवाद्यांनी निष्पाप शाळकरी मुलांची निर्मम हत्या केली. या हत्येने अवघे जग सुन्न झाले. दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो आणि दहशतवाद हा माणुसकी संपल्यावरच सुरु होतो. शहरातील अनेक शाळांनी पेशावरच्या घटनेचा निषेध, संताप आणि हळहळ व्यक्त करीत या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यात मोमीनपुरा, हसनबाग येथील उर्दु आणि हिंदी शाळेच्या मुस्लीम विद्यार्थ्यांनीही श्रद्धांजली अर्पण करताना या घटनेचा निषेध व्यक्त केला. दहशतवाद्यांनी निष्पाप शाळकरी मुलांची केलेली हत्या या मुलांना धक्का देणारी होती. अशी घटना यानंतर जगात कुठेही घडू नये, यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांनी अल्लाहला साकडे घातले. हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा कुठलाच धर्म नाही कारण इस्लाम या बाबीला मान्यता देत नाही, असेही या मुलांनी सांगितले.