शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीच्या जीवनाचे पैलू उलगडणारा कथात्म कोलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 03:00 IST

स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. तिचे प्रत्येकाशी बदलत जाणारे नाते आणि भावनांंचा पट तसा गुंतागुंतीचा आणि हळवा आहे.

अभिव्यक्ती संस्थेचे आयोजन : कथा लेखिकांचे दमदार सादरीकरण नागपूर : स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. तिचे प्रत्येकाशी बदलत जाणारे नाते आणि भावनांंचा पट तसा गुंतागुंतीचा आणि हळवा आहे. अभिव्यक्तीच्या सदस्यांनी हा स्त्रियांच्या जीवनाचा कोलाज कथांमधून सादर करीत एख अनोखा अनुभव श्रोत्यांना दिला. हा कार्यक्रम अभिव्यक्ती संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला. हा कार्यक्रम शंकरनगरच्या जिजामाता सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या आणि सेन्सॉर बोर्डाच्या नवनिर्वाचित सदस्य माधुरी आशिरगडे अध्यक्षस्थानी होत्या. मातेची ममता हा स्त्री लेखिकांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे त्याला प्राधान्य होते. एका उच्चपदविभूषित मुलाची अनास्था व व्यावहारिक दृष्टिकोन यामुळे व्यथित झालेली आई विजया मारोतकर यांनी साकारली. अल्पवयात आई झालेल्या जुलेखाची व्यथा अंजली पांडे यांच्या कथेतून दिसली. लेहसारख्या ठिकाणी काम करणाऱ्या वैमानिकांच्या बायकांना मायेचा ओलावा देणाऱ्या बॉसच्या पत्नीची ओळख गौरी अंधारे यांनी करून दिली. मोलकरीण हा सामान्य स्त्रियांच्या जीवनातला दुखरा कोपरा आहे. त्याबद्दलची काळजी मिटावी म्हणून शर्मिला महादेवकरांनी भेटीला आलेल्या देवालाच वेठीस कसे धरले हे आपल्या विनोदी शैलीत सांगितले. एका अनोख्या पैजेची पूर्ती करणारी मुलगी वीणा कुळकर्णी यांनी उभी केली. स्वाती देशपांडेला गावातल्या कामगाराचं मदत करणं भावलं. तर छाया कावळेनी गावाकडल्या इरसालपणाचा प्रत्यय आपल्या वऱ्हाडी कथेतून दिला. माधुरी आशिरगडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कथाकथन प्रभावी होण्यासाठी कथेचा आशय व सादरीकरण दोन्ही महत्त्वपूर्ण आहे, हे सांगितले. अभिव्यक्तीतर्फे यासाठी एखादे शिबिर घ्यावे असेही त्यांनी सुचविले. कथा कथनासाठी आत्मविश्वास महत्त्वपूर्ण असून सर्व सादरीकरणात तो होता, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माधुरीतार्इंचा सत्कार अभिव्यक्तीच्या अध्यक्ष सुप्रिया अय्यर यांनी केला. (प्रतिनिधी)