शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा वीज यंत्रणेला तडाखा

By admin | Updated: June 10, 2016 03:02 IST

उपराजधानीत बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाचा महावितरण आणि एसएनडीएलच्या वीज यंत्रणेला चांगलाच तडाखा बसला.

नागपूर : उपराजधानीत बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाचा महावितरण आणि एसएनडीएलच्या वीज यंत्रणेला चांगलाच तडाखा बसला. यात शहरातील बहुतांश वीज यंत्रणा विस्काळीत होऊन अनेक वस्त्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये काही वस्त्या रात्रभर अंधारात बुडाल्या होत्या. महावितरणच्या काँग्रेसनगर व बुटीबोरीसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत तत्परता दाखवीत बहुतांश भागातील वीजपुरवठा काही वेळेतच सुरळीत केला. बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यामुळे महावितरणच्या धंतोली, शंकरनगर, धरमपेठ, साईमंदिर, सावरकरनगर, छत्रपतीनगर, विकासनगर व रामकृष्णनगर य भागातील वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने खंडित झाला होता. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी यापैकी बहुतांश भागातील वीजपुरवठा अर्धा ते एक तासाच्या आत सुरळीत केला. त्याच वेळी एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना मात्र गुरुवारी दुपारपर्यंत कसरत करावी लागली. मात्र तरीसुद्धा सर्व वस्त्यांमधील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. काटोल रोड परिसर हा रात्रभर अंधारात बुडाला होता. (प्रतिनिधी)अपघातटाळण्यासाठी टीप्स! १) पावसात मोबाईलवर बोलणे टाळा. २) उच्चदाब वाहिनीखाली उभे राहून फोटो काढू नका. कारण फ्लॅशमधून वीज येऊ शकते.३) झाडाखाली पावसात उभे राहू नका.४) विजेच्या खांबाला जनावरे बांधू नका.५) विजेच्या खांबाला पावसात हात लावू नका. ६) ओल्या बांबूने आकडा टाकून वीजचोरी करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका.