शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीसाठी रास्ता रोको, जीआरची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:19 IST

शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने केलेल्या आवाहनाला नागपुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देसंविधान चौक : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने केलेल्या आवाहनाला नागपुरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरात संविधान चौक येथे धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याशिवाय शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या जी.आर.ची जाहीर होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या अटी रद्द करून शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकरी पुन्हा कर्जात जाऊ नये, यासाठी स्वामिनाथन कमेटीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा शेतमालाला भाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी आंदोलनाचे आवाहन केले होते. नगपुरातील सुकाणू समितीतर्फे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. धरणे आंदोलनानंतर रास्ता राको करण्यात आला. आंदोलनात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, दुनेश्वर पेठे, विजयकुमार शिंदे, धर्मराज मानकर, रवींद्र तरारे, मिलिंद महादेवकर, किशोर चोपडे, रविशंकर मांडवकर, शरद खेडीकर, अरुण वनकर, गणेश भोयर, विराचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. रवी संन्याल, नीरज खांदेवाले, जन संघर्ष मंचचे ए.के. घोष, बंडू मेश्राम, यशवंत चिंतले, माधव भोंडे, महराष्ट्र राज्य किसान सभा नागपूरचे शरद पिंपळे, सुधाकर वाघुके, करुणा साखरे, ललन मेश्राम, वसंत मुंडले, गंगाराम खेडकर, अखिल भारतीय किसान सभाचे अरुण लाटकर, संजय रणदिवे, चंदा मेंढे, जी.के. गोतमारे, मो. ताजुद्दीन, मधुकर भरणे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.