शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

घरावर दगडफेक, कारच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : दाेघांनी संताजीनगर, कांद्री (ता. पारशिवनी) येथील एका घरावर दगडफेक करीत घरासमाेरील कारच्या काचा राॅडने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : दाेघांनी संताजीनगर, कांद्री (ता. पारशिवनी) येथील एका घरावर दगडफेक करीत घरासमाेरील कारच्या काचा राॅडने फाेडल्या. ही घटना साेमवारी (दि. २१) सकाळी घडली. याबाबत पाेलिसात तक्रार नाेंदविण्यात आली असून, पाेलिसांनी आराेपीस तातडीने अटक करून अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली असून, याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव पारित केला आहे.

रमेश गाेडघाटे, रा. संताजीनगर, कांद्री हे नागपूर शहरातून प्रकाशित हाेणाऱ्या मराठी दैनिकासाठी प्रतिनिधी म्हणून काम करतात. बंटी शर्मा, रा. संताजीनगर, कांद्री व अन्य एकाने सकाळी त्यांच्या घरासमाेर येऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली. या दाेघांनीही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांच्या घरावर दगडफेक करीत दारावर धारदार वस्तूने प्रहार करीत दार ताेडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी रमेश गाेडघाडे यांच्या एमएच-४०/केआर-३२८८ क्रमांकाच्या कारवर लाेखंडी राॅडने प्रहार करीत कारच्या काचाही फाेडल्या. परिणामी, रमेश गाेडघाटे यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आराेपींना तातडीने अटक करण्याची मागणी अतुल हजारे, रमेश गोडघाटे, जगन शेंद्रे, पप्पू गुप्ता, अजय रॉय, श्यामसुंदर गुप्ता, लल्ला डेहरिया, ताहीर सय्यद, रितेश गव्हाणे, बंडू मानवटकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

ग्रामपंचायतचा ठराव

आराेपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती नागरिकांनी दिली. या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांचा वावर वाढला असून, ते महिला व तरुणींना शिवीगाळ करतात, शस्त्राचा धाक दाखवितात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार अवैध धंद्यांमुळे वाढला असल्याने या लाेकांचा बंदाेबस्त करण्यासाेबतच अवैध धंद्यांना आळा घालण्याची मागणीही नागरिकांनी केली असून, ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत ठराव पारित केला. या ठरावाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.