शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हावडा मार्गावरील तीन गाड्यात चोरी

By admin | Updated: August 21, 2015 03:31 IST

हावडा मार्गावरील तीन वेगवेगळ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांचा तीन प्रवाशांचा १.६७ लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी पळविल्याची घटना घडली.

नागपूर : हावडा मार्गावरील तीन वेगवेगळ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांचा तीन प्रवाशांचा १.६७ लाखाचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी पळविल्याची घटना घडली. पहिल्या घटनेत रेल्वेगाडी क्रमांक १२४०९ गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये रामनिवास जैन (७८) रा. लेलुंगा जि. रायगड हे बी-२, बर्थ क्रमांक ३९ वरून प्रवास करीत होते. बिलासपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या दोन सुटकेस पळविल्या. त्यात रोख ४० हजार, २० हजार रुपयांचे कपडे असा एकूण ६० हजाराचा मुद्देमाल होता. दुसऱ्या घटनेत विजयालक्ष्मी स्वायन (५५) रा. सेतु चन्नाब रोड, जि. जमशेदपूर या रेल्वेगाडी क्रमांक १२८१० हावडा-मुंबई मेलने (कोच ए-१, बर्थ २९) प्रवास करीत होत्या. अज्ञात आरोपीने त्यांची बॅग पळविली. त्यात एकूण ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल होता. तिसऱ्या घटनेत सुजयकुमार शहा रा. कुस्तीवाटिका मकरपुरा वडोदरा हे रेल्वेगाडी क्रमांक १२१३० आझाद हिंद एक्स्प्रेसने (कोच ए-१, बर्थ ३७) प्रवास करीत होते. बिलासपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर अज्ञात आरोपीने त्यांची नजर चुकवून त्यांची सुटकेस पळविली. सुटकेसमध्ये ५ हजार रुपये रोख, २ घड्याळ, कपडे असा एकुण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)