शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या होर्डिंंग्जपासून सुरुवात करा; अतिक्रमणविरुद्धच्या कारवाईत नागपूरच्या महापौरांचे स्पष्ट निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:55 IST

शहरातील विविध भागात अवैधरीत्या होर्डिंग लावून शहर विद्रुप करणाऱ्यांविरोधात मंगळवारी कारवाई सुरू करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागात अवैधरीत्या होर्डिंग लावून शहर विद्रुप करणाऱ्यांविरोधात मंगळवारी कारवाई सुरू करण्यात आली. नेहरूनगर झोन क्षेत्रातील अवैध होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. यात अवैधरीत्या लावण्यात आलेल्या महापौरांच्या अभिनंदनाच्या होर्डिंगवर पथकाने जेसीबी चालविला.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध होर्डिंगविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार मंगळवारी नेहरूनगर झोनच्या पथकाने अवैध होर्डिग काढण्याबाबत धडक कारवाई सुरू केली.नेहरूनगर झोन क्षेत्रात ठिकठिकाणी महापौर संदीप जोशी यांचे अभिनंदन करणारे फलक अवैधरीत्या लावण्यात आल्याचे दिसून आले. विद्युत खांबावरील व अन्य ठिकाणी लावण्यात आलेल्या महापौरांच्या होर्डिंगवर जेसीबी चालविण्यात आला. मनपा पथकाद्वारे अवैध होर्डिंग विरोधातील कारवाई करणाऱ्या पथकाचे संदीप जोशी यांनी अभिनंदन केले आहे. नियम सर्वांना सारखे असून नियमाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कुणीही असली तरी त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कुठल्याही पदाधिकाऱ्याची भीती न बाळगता त्यांच्यावर होणारी कारवाई ही स्वागतार्हच आहे, अशा शब्दांत महापौरांनी पथकाचे कौतुक केले. शहरात विद्युत खांब, सिग्नल, झाडे, इलेक्ट्रिक डीपी बॉक्स, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या होर्डिग लावले जात आहेत. अशा सर्व अवैध होर्डिंगवर कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

माझ्या होर्डिंगपासून सुरुवात कराअवैध होर्डिंगवर कारवाई करताना महापालिकेच्या पथकावर राजकीय दबाव येतो. या दबावाला न जुमानता पथकाला होर्डिग हटविण्याची कारवाई करता यावी, यासाठी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या अभिनंदनाच्या होर्डिंगपासून कारवाईला सुरुवात करा, असे निर्देश दिले होते. यामुळे पथकाचे मनोबल वाढले आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशी