शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

'खाऊ गल्ली' तातडीने सुरू करा! महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 21:25 IST

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्दे निरीक्षण प्रसंगी पथदिवे, फ्लोरिंग दुरुस्तीच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौरसंदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या ‘वॉक अ‍ॅण्ड टॉक विथ मेयर’ आणि ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ या उपक्रमादरम्यान गांधीसागर लगतची खाऊ गल्ली सुरू करण्याची मागणी नागरिकांनी के ली होती. गांधीसागर तलावाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढल्याचे नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणले. याची दखल घेत महापौरांनी यांनी १ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित ब्रेकफास्ट विथ मेयर या कार्यक्रमात १ जानेवारी रोजी खाऊ गल्ली नागरिकांसाठी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी खाऊ गल्लीचा निरीक्षण दौरा केला. खाऊ गल्लीतील पार्किं गमधील फ्लोरिंग तुटलेले आहे. दुरुस्तीची लघु निविदा काढून सात दिवसाच्या आत काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निरीक्षणादरम्यान उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन त्यातून आय ब्लॉक दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.खाऊ गल्ली पार्किं गस्थळी ठळक अक्षरात फलक लावणे, तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी वॉटर एटीएम सुरू करणे, परिसरातील सर्व पथदिवे तातडीने सुरू करणे, तलावाच्या रेलिंगला लागून असलेली झुडुपे, गवत काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिसरातील दैनंदिन साफसफाईची जबाबदारी प्रभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली. निर्देशाची अंमलबजावणी तातडीने होते की नाही ह्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सहायक आयुक्त किरण बागडे आणि उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यावर निश्चित करण्यात आली. या कार्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महापौरांनी यावेळी दिला. यावेळी क्रीडा सभापती प्रमोद चिखले, नगरसेवक हर्षला साबळे, विजय चुटेले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौर