शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पहिले अखर्चित निधी खर्च करा

By admin | Updated: June 10, 2017 03:04 IST

शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात आलेला निधी जि.प.च्या शिक्षण विभागाने खर्च केलेला नाही.

शिक्षण विभागाला सूचना : गणवेशाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत देण्यात आलेला निधी जि.प.च्या शिक्षण विभागाने खर्च केलेला नाही. आता विद्यार्थ्यांना गणवेशाचे अनुदान विभागाला द्यायचे आहे. शिक्षण विभागाला त्यासाठी २.९ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाने जि.प.च्या शिक्षण विभागाला सर्व शिक्षा अभियानाचा अखर्चित असलेला निधी गणवेशावर खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभागाकडे अद्यापही १.९ कोटी रुपये शिल्लक आहे. हा निधी आता गणवेशाच्या अनुदानासाठी वापरण्यात येणार आहे. शालेय गणवेशाचे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून थेट विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. येत्या २७ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. वर्ग १ ते ८ च्या १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांना गणवेशासाठी निधी मिळणार आहे. त्यासाठी प्रती विद्यार्थी ४०० रुपयेप्रमाणे २ कोटी ९४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाने गणवेशासाठी शिक्षण विभागात शिल्लक असलेल्या निधीतून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे वळते करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासोबतच प्रत्येक शाळांनी पालकसभा घेऊन गणवेश खरेदीबाबत त्यांना सूचना करण्याचेही सांगण्यात आले आहे. पालकांनी गणवेश खरेदी करून त्याची पावती शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे जमा केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ४०० रुपये वळते करण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा शिक्षण विभागाकडे गेल्या वर्षीचा सर्व शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या निधीपैकी १ कोटी ९० लाखाचा निधी शिल्लक आहे. सद्यस्थितीत शिल्लक निधीतून गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून, उर्वरित १ कोटी ४ लाखाचा निधी हा शाळा सुरू होण्यापूर्वीच विभागाच्या खात्यात वळते करण्यात येईल, असे शासनातर्फे कळविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली.