शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरन्यायाधीशांशिवाय झाला विशेष दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र श्रीनिवास बोबडे यांनी मानद पदवी व सन्मानचिन्हाचा स्वीकार केला.

नागपूर विद्यापीठातर्फे सुमारे सात दशकांनंतर दीक्षांत सभागृहात विशेष व १०८ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ऑनलाईन समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईन माध्यमातून अध्यक्षस्थान भूषविले तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशिवाय व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता मंचावर उपस्थित होते. सर्व पदवीधरांनी आयुष्यात प्रामाणिकपणाची कास धरावी. तसेच पालक, गुरु व देशाबाबत श्रद्धा बाळगावी, असे आवाहन राज्यपालांनी केले. विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरा संघर्ष पदवीनंतर सुरू होत असतो. आयुष्याच्या कुरुक्षेत्रातील खरा शत्रू ओळखून व स्वत:चे दुर्गुण बाजूला सारत संघर्ष केला पाहिजे. संशोधनाचा फायदा देश व समाजाच्या प्रगतीला होतो. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.

दीक्षांत समारंभात ७७ हजार ९१२ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदवी, २ डी.लिट. तर ८६७ उमेदवारांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

१,२५६ विद्यार्थ्यांनी पाहिला ऑनलाईन समारंभ

नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांशिवाय दीक्षांत समारंभ पार पडला. इंटरनेटवरील विविध माध्यमांवर दीक्षांत समारंभाचे लाईव्ह प्रसारण झाले. ७७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली. त्यातील १ हजार २५६ विद्यार्थ्यांनी यू-ट्यूबवरील विद्यापीठाच्या चॅनलवर समारंभ पाहिला. तर वेबेक्सवर मोजके विद्यार्थी व पीएचडी उमेदवार सहभागी झाले होते. फेसबुकवर शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.