गुरुदेव फाऊंडेनशचा उपक्रम : रविवारी प्रकल्पाचे उद्घाटननागपूर : सिकलसेल व थॅलेसेमियाच्या गरजू रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष रक्तपुरवठा होणे महत्त्वाचे आहे. अशा रुग्णांना मदत करण्यासाठी गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्यातवीने ‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ हा प्रकल्प राबविण्यात येईल. याचे उद्घाटन रविवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात होईल, अशी माहिती लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.डॉ. वरभे म्हणाले, लाईफलाईन रक्तपेढीने थॅलेसेमियाच्या ८८ मुलांना दत्तक घेतले आहे. त्यांना मोफत रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या साधारण रक्ताचा पुरवठा रक्तपेढीकडून होत आहे. या मुलांना विशेष रक्तपुरवठा झाल्यास ते साधारणपणे ५० ते ७० वर्षांपर्यंत सामान्य जीवन जगू शकतील. अशा रुग्णांना मदत करण्यासाठी गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या ‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ या प्रकल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी डॉ. विलास डांगरे राहतील. उद्घाटनापूर्वी ‘सिकलसेल-थॅलेसेमिया’ निर्मूलन रॅली काढण्यात येईल.लोकमत चौकातून निघणाऱ्या या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हिरवी झेंडी दाखवतील. रॅलीत सुमारे ३० विविध संस्थेचा सहभाग असणार आहे, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेत रक्तपेढीच्या संचालिका डॉ. वनश्री वरभे उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)
सिकलसेल-थॅलेसेमियाच्या रुग्णांना विशेष रक्तपुरवठा
By admin | Updated: November 21, 2014 00:45 IST