शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे व मेट्रो रिजनच्या विकासावर विशेष लक्ष

By admin | Updated: September 5, 2014 01:12 IST

नागपूर शहराच्या बाह्य भागाच्या विकासासाठी मेट्रो रिजनअंतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याची आपण अंमलबजावणी करू. तसेच महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊ,

सभापती हर्षदीप कांबळे यांची ग्वाही : दराडे यांच्याकडून पदभार स्वीकारला नागपूर : नागपूर शहराच्या बाह्य भागाच्या विकासासाठी मेट्रो रिजनअंतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्याची आपण अंमलबजावणी करू. तसेच महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही नासुप्रचे नवनियुक्त सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.मावळते सभापती प्रवीण दराडे यांनी गुरुवारी नवनियुक्त सभापती डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे पदभार सोपविला. यावेळी पत्रकारांशी बोलताना कांबळे यांनी नागपूर हे आपल्या आवडीचे शहर असल्याचे सांगितले. या शहराच्या विकासासाठी आपण सर्वोपरी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.तीन हजार नागरिकांसाठी फ्लॅट योजना - दराडे अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना राहण्यासाठी घर उपलब्ध व्हावे, यासाठी नासुप्रने वेळोवेळी पुढाकार घेतला. नासुप्रने भामटी येथे २०० फ्लॅटची योजना उभारली. येत्या काळात पारडी येथे ६२५ कोटी रुपये खर्च करून ३,११६ फ्लॅट बांधले जातील, असे मावळते सभापती प्रवीण दराडे यांनी सांगितले. दराडे यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांना उजाळा दिला. ते म्हणाले, आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासाचे पुढील ५० वर्षांचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात आले. पुढील २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला. हरित पट्टा, ना विकास क्षेत्र (एनडीझेड) व आरक्षणाने बाधित असलेले ले-आऊट नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. याचा फायदा तीन लाख लोकांना झाला. नासुप्रच्या मालकीच्या ६०० खुल्या भूखंडांवर सुरक्षा भिंत बांधण्यात आली. ३५ कोटी रुपये खर्च करून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात आले. ताजबाग सौंदर्यीकरण, दीक्षाभूमीवर पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यात आला. रस्ते विकासासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. गुंठेवारी ले-आऊटच्या विकासासाठी १४६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)