शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन व फल्ली तेल महाग

By admin | Updated: May 14, 2015 02:43 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि लग्नसराईत खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीमुळे ..

ंनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण आणि लग्नसराईत खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाववाढीमुळे महागाईत पुन्हा भर पडली असून त्याचा फटका सामान्यांना बसला आहे. प्रति किलो ५ ते ६ रुपयांची वाढगेल्या १५ दिवसांत सोयाबीन आणि फल्ली तेलाच्या किमती प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी वधारल्या आहेत. किरकोळ बाजारात भाव ६६ वरून ७२ रुपयांवर गेले आहे. त्यात आणखी ५ ते ६ रुपये वाढीची शक्यता आहे. सोयाबीन डब्याचे (१५ किलो) भाव ११६५ ते ११८० रुपयांवर तर फल्ली तेलाचा डबा १५७० ते १६०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात फल्ली तेल १०४ वरून ११० रुपयांवर गेले आहे. भाववाढीनंतरही बाजारात ग्राहकांची गर्दी आहे. मे आणि जून महिन्यात लग्नसराईमुळे मागणीत वाढ राहील, अशी प्रतिक्रिया इतवारी बाजारातील अनिल अ‍ॅण्ड संजय कंपनीचे संचालक अनिलकुमार अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली. रुपयांच्या घसरणीमुळे आयातीवर परिणामसोयाबीन आणि फल्ली तेलासह अन्य खाद्य तेलाच्या किमतीही वधारल्या आहेत. लग्नसराईत पाम तेलाला मागणी असते. याशिवाय मलेशिया येथून या तेलाची आयात करण्यात येते. रुपयांच्या घसरणीमुळे आयातीवर परिणाम झाला आहे. १० दिवसांआधी प्रति किलो ६२ रुपये असलेले पाम तेल ६८ रुपयांवर पोहोचले आहे. त्यात आणखी वाढ होईल. तसेच उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि राजस्थान सर्वाधिक विक्री होणाऱ्या सरसो तेलाच्या किमतीत तब्बल १० रुपयांची वाढ झाली असून भाव प्रति किलो ९० वरून १०० रुपयांवर पोहोचले आहेत. यंदा अतिवृष्टीचा पिकांना फटका बसल्याचे कारण सांगितले जात आहे. शिवाय सट्टा बाजारानेही भाववाढीला हातभार लावल्याचे अग्रवाल म्हणाले.इतवारी तेल बाजारात राईस बॅ्रड तेलाची मागणी वाढली आहे. ११०० रुपये डबा आहे. १५ दिवसांत प्रति किलो भाव ७५ वरून ८० रुपयांवर गेले आहेत. दरदिवशी भाववाढीमुळे ग्राहक त्रस्त आहेत. इतवारी बाजारात दररोज १२ ते १३ हजार डब्याची विक्री होते. त्यात ७ ते ८ हजार डबे सोयाबीन तेल विकले जाते. उर्वरित डब्यामध्ये अन्य तेलाचा समावेश आहे. जूनच्या अखेरपर्यंत खाद्य तेलाला मागणी राहील, असे अनिल अग्रवाल म्हणाले. (प्रतिनिधी)