शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएकडून शर्मा जेरबंद होताच निकटस्थ गेला सुट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

तपास यंत्रणात चर्चेचे मोहोळ : वरिष्ठांनी साधली चुप्पी नरेश डोंगरे ! लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एन्काऊंटर ...

तपास यंत्रणात चर्चेचे मोहोळ : वरिष्ठांनी साधली चुप्पी

नरेश डोंगरे !

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एन्काऊंटर स्पेशलिस्ट, वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याच्या अटकेनंतर त्याचा खासमखास असलेल्या नागपुरातील एका अधिकाऱ्यासह दोघे एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा)च्या रडारवर असल्याची शीर्षस्थ सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसांपासून या संबंधाने पोलीस दलात चर्चेचे मोहोळ उठले आहे. ते कानावर पडताच नागपुरातील वादग्रस्त अधिकारी सुट्टीवर गेल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ॲन्टेलियासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके भरलेली कार आणि मनसुख हिरेनची झालेली हत्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक केली. सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे. शर्माच्या चौकशीतून झालेल्या धक्कादायक खुलाशानुसार त्याचे खासमखास असलेले एक वरिष्ठ आणि कनिष्ठ असे दोन अधिकारी रडारवर आल्याची खास सूत्रांची माहिती आहे. त्यातील एक अधिकारी सध्या नागपुरात कार्यरत आहे. बिल्डरकडून अडीच कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप झाल्यामुळे त्याची गडचिरोली रेंजमध्ये बदली करण्यात आली होती. अनिच्छेने का होईना तो अधिकारी गेल्या महिन्यात येथे रुजू झाला. हा अधिकारी प्रदीप शर्मा आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा अत्यंत निकटस्थ मानला जातो. गुरुवारी एनआयएने शर्माला अटक केल्यानंतर त्याचे अनेक निकटस्थ हादरले. नागपुरातील या अधिकाऱ्यानेसुद्धा तडकाफडकी बदलीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने भावनिक कारण पुढे केल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अधिकारी सध्या मुंबईत असून तो एनआयएच्या रडारवर असल्यामुळे तो परत नागपूरला परतणार की नाही, याबाबत कुणी भाष्य करायला तयार नाही. पुढे काय घडामोडी होऊ शकतात, त्यासंबंधाने तपास यंत्रणांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत.

---

तोंडावर बोट!

विशेष म्हणजे यासंदर्भाने उलटसुलट चर्चेला उधाण आले असले तरी कुणीही खुलून बोलायला तयार नाहीत. तो विषय आपल्या अखत्यारीत नसल्याची सूचक प्रतिक्रिया संबंधित वरिष्ठ देत आहेत.

----