शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मुलाने केला वडिलांचा खून

By admin | Updated: March 23, 2015 02:13 IST

दारूच्या नशेत वडिलांकडून होणारी मारहाण आणि शिवीगाळ असह्य झाल्यामुळे मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला.

नागपूर : दारूच्या नशेत वडिलांकडून होणारी मारहाण आणि शिवीगाळ असह्य झाल्यामुळे मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला. वेकोलिच्या कोयला विहार कॉलनीत शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. प्रोसेनजित नेहारंजन बिसवास (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते वेकोलित वाहनचालक म्हणून कार्यरत होते. ए-५ क्वॉर्टरमध्ये ते राहायचे. त्यांची पत्नी संगीता चंद्रपूरला राहते. मुलगा (आरोपी) अक्षय (वय २१) दहावी नापास आहे. तो मोबाईल रिपेरिंगचे काम करायचा. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्याने काम सोडले. तो दिवसभर रिकामा फिरायचा. त्यामुळे वडील प्रोसेनजित त्याच्यावर चिडायचे. दारूच्या नशेत नेहमी मारहाण, शिवीगाळ करायचे. त्यामुळे अक्षय त्रस्त झाला होता. अलीकडे तोसुद्धा दारू पीत होता. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास प्रोसेनजित दारू पिऊन अक्षयला शिवीगाळ करू लागले. ते टोचून बोलत होते. त्यात त्यांनी अक्षयला घराबाहेर काढून दिले. त्यामुळे बापलेकातील वाद वाढतच गेला. रागाच्या भरात आरोपीने धारदार चाकूने वडिलांच्या मानेवर, छातीवर सपासप वार केले. प्रोसेनजित रक्ताच्या थारोळ्यात कोसळून तडफडू लागले. ते पाहून शेजाऱ्याच्या मदतीने अक्षयने त्यांना गिट्टीखदानमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची स्थिती नाजूक असल्याचे पाहून डॉक्टरने त्याला मेयोत नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीने प्रोसेनजितला मेयोत नेले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, मुलाने वडिलांचा खून केल्याच्या वार्तेने कोयला विहार कॉलनीत प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी आरोपी अक्षयला काही वेळेतच ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करुन त्याचा दोन दिवसाचा पीसीआर मिळवला. एपीआय पाटील, ज्ञानेश भेदोडकर पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)