शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया-राहुल गांधींच्या दौऱ्याची रूपरेषा ठरणार

By admin | Updated: March 20, 2016 03:03 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर ...

पक्ष पदाधिकाऱ्यांची आज बैठक : अशोक चव्हाण, मोहनप्रकाश राहणार उपस्थितनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केल्यानंतर ११ एप्रिल रोजी नागपुरात भव्य समारोपीय सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आखणीसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत रविवारी नागपुरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ९ ते १४ एप्रिल दरम्यानची कुठलीही एक तारीख ठरविण्यात येणार होती. अखेर ११ एप्रिल ही तारीख अंतिम झाली आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी कार्यक्रमाच्या अगोदर दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्य सोहळ्याच्या स्थानी जातील. या कार्यक्रमाचे अंतिम स्थळ व एकूण रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी दुपारी १.३० वाजता राणी कोठी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉंग्रेसचे विदर्भातील माजी मंत्री, आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कार्यक्रमाची एकूण आखणी करण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.(प्रतिनिधी)