शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कुणी केले देवदर्शन तर कुणी पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक/कामठी : काेराेना संक्रमणामुळे नववर्षाच्या स्वागतात काेणतीही कमी दिसून आली नाही. नागरिकांनी स्वत:साेबतच इतरांची काळजी घेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक/कामठी : काेराेना संक्रमणामुळे नववर्षाच्या स्वागतात काेणतीही कमी दिसून आली नाही. नागरिकांनी स्वत:साेबतच इतरांची काळजी घेत तसेच उपाययाेजनांचे पालन करीत नववर्षाचे जल्लाेषात स्वागत केले. यात काहींनी देवदर्शन केले तर काहींनी पर्यटनाचा आनंद लुटला.

देवदर्शन व पर्यटनासाठी रामटेकचे गडमंदिर प्रसिद्ध आहे. नववर्षानिमित्त प्रभू रामचंद्र व सीतामाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसह पर्यटकांनी गडमंदिर परिसरात गर्दी केली हाेती. मंदिर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असल्याने अनेकांना दर्शन घेणे शक्य न झाल्याने त्यांचा हिरमाेड झाला. पार्किंगसाठी प्रशस्त जागा नसल्याने नागरिकांनी राेडलगत वाहने उभी केली हाेती. त्यामुळे राेडच्या दाेन्ही बाजूला एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. गडमंदिरासाेबतच खिंडसी जलाशय परिसरातही पर्यटकांनी गर्दी केली हाेती.

रामटेक शहर व परिसरात गुरुवारी (दि. ३१) सायंकाळपासूनच पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. गर्दीची ठिकाणे निवडून तिथे अतिरिक्त पाेलीस तैनात केले हाेते. अनुचित प्रकार व अप्रिय घटना घडणार नाही, याची काळजी घेण्यात आली हाेती, अशी माहिती रामटेकचे ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. दुसरीकडे, रामटेक परिसरातील वाहतूक व्यवस्था सांभाळताना पाेलिसांच्या नाकीनऊ आले हाेते. वाहतूक काेंडीमुळे काहींनी गडमंदिर परिसरात जाण्याऐवजी परत जाणे पसंत केले.

कामठी शहरातील कन्हान मार्गावरील आडापूल साईमंदिरात शेकडाे भाविकांनी दर्शन घेतले. देशाला काेराेनामुक्त करण्यासाठी साकडेही घालण्यात आले. काही भाविकांनी पूजा व आरती केली तर काहींनी सत्यनारायण कथाही केली. काहींनी महाप्रसादाचे आयाेजन केले हाेते. दर्शन घेताना व प्रसाद वितरण करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले हाेते. मंदिर परिसरात कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यात आली हाेती.

...

पर्यटकांची गर्दी

पर्यटकांनी रामटेकच्या खिंडसीसाेबतच उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या गाेठणगाव गेटजवळ गर्दी केली हाेती. या भागात वाघांचे हमखास दर्शन हाेत असल्याने हे ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे झाले आहे. सध्या या अभयारण्यातील गाेठणगाव गेट परिसरात टी सिक्स नावाच्या वाघाचा वावर आहे. त्याला बघण्यासाठी पर्यटक व वन्यप्रेमी दूरदूरून येतात. नववर्षानिमित्त हा परिसर गर्दीने फुलून गेला हाेता. काहींना वाघाचे दर्शनही झाले. काहींनी जंगल सफारीचा आनंद लुटला.