शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एका दुर्दैवी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

By admin | Updated: February 25, 2016 03:04 IST

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर येथील एका दुर्दैवी कुटुंबावरील सामाजिक बहिष्काराचे एक प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात दाखल झाले.

जेएमएफसी न्यायालयात न्यायाची याचना : चौकशीचे आदेशनागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर येथील एका दुर्दैवी कुटुंबावरील सामाजिक बहिष्काराचे एक प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात दाखल झाले. १० मार्चपर्यंत तक्रारकर्त्याचे बयान नोंदवण्यात यावे, गुन्हा होत असेल तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला दिले आहे. अवतारसिंग सिमरतसिंग मारवाह यांनी फौजदारी व्यवहार संहितेच्या कलम २०० अंतर्गत ही फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बुद्धनगर येथील गुरुद्वारा श्री कलगीधर दरबारचे अध्यक्ष एस. मलकियतसिंग सग्गू, बाबा बुधाजीनगर येथील गुरुद्वारा गुरू तेग बहादूर साहिबचे अध्यक्ष निशानसिंग घोत्रा यांच्यासह ११ गुरुद्वारांच्या अध्यक्षांना आरोपी केले आहे. या सर्व अध्यक्षांनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी फतवा काढून आम्हाला समाजातून बहिष्कृत केले. आमच्या कुटुंबाशी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणार नाही, कोणतेही नाते ठेवणार नाही, अशा आशयाचा हा फतवा आहे. तब्बल १४ वर्षे गुरुद्वाराचे अध्यक्ष म्हणून राहिलेले कामठी रोड काश्मिरी गल्ली येथील जयसिंग बावासिंग पुन्नी यांनाही कुटुंबासह समाजातून बहिष्कृत करण्यात आलेले आहे. जयसिंग पुन्नी यांनी अवतारसिंग मारवाह यांना मदत केली म्हणून त्यांना बहिष्कृत करण्यात आले. मारवाह यांनी आपल्या विधवा वहिनीला वडिलांच्या मालमत्तेतील हिस्सेवाटणीचे १५ लाख रुपये दिले नाही, असा आरोप करून त्यांच्यावर हा बहिष्कार घालण्यात आला. आपला भाऊ हयात असताना त्याला आपण हिस्सा देऊन चुकलो, अशी बाजू मारवाह यांनी गुरुद्वाराच्या कमिटीपुढे मांडली होती. आपली बाजू नीट ऐकून न घेता आपणावर अन्यायपूर्ण बहिष्कार घालण्यात आला. आपले व जयसिंग पुन्नी यांचे छायाचित्र असलेला हा सामाजिक बहिष्काराचा फतवा सर्व गुरुद्वारांच्या दारांवर लावण्यात आला आणि बदनामी करण्यात आली, असा उल्लेख अवतारसिंग मारवाह यांनी आपल्या तक्रारीत करून आरोपींविरुद्ध भादंविच्या ४६९, ४०४, ५०५, ३४ कलमांतर्गत खटला चालवून शिक्षा करण्यात यावी, अशी प्रार्थना अवतारसिंग यांनी तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)