शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाविरोधात ‘सोशल’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

पक्षिमित्रांच्या वेगवेगळ्या संस्था, संघटना तसेच वैयक्तिक स्तरावरही प्रयत्न चालविले जात आहेत. यातीलच ग्रोविल फाऊंडेशन हा तरुणांचा ग्रुप दरवर्षीप्रमाणे यावेळीही ...

पक्षिमित्रांच्या वेगवेगळ्या संस्था, संघटना तसेच वैयक्तिक स्तरावरही प्रयत्न चालविले जात आहेत. यातीलच ग्रोविल फाऊंडेशन हा तरुणांचा ग्रुप दरवर्षीप्रमाणे यावेळीही सक्रिय झाला आहे. वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या पक्षिमित्रांनी एकत्रित येत हे नायलॉन मांजाविरोधात अभियान छेडले आहे. या ग्रुपमध्ये सर्पमित्र, प्राणिमित्र, तज्ज्ञ डॉक्टर्स, जखमी पक्ष्यांसाठी बचाव पथक राबविणारे कार्यकर्ते तसे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पक्षिप्रेमींचा समावेश आहे. अ‍ॅड़ लक्ष्मी मालेवार, आकाश जगताप, दिप्तांशू खरबडे, हिमांशू कांबळे, शिरीन चिमथानवाला, माधुरी इंगळे, चेतन पांडे, पीयूष छाबडिया आदी तरुणांनी यावर्षी या अभियानाची जबाबदारी घेतली असून १०० च्यावर सक्रिय तरुण या मदतकार्यासाठी सरसावले आहेत.

तज्ज्ञांकडून घेतले प्रशिक्षण

जखमी पक्ष्यांना वाचविण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण घेण्यात आल्याचे आकाश जगताप याने सांगितले. अर्बन रेस्क्यू विशेषज्ञ राजेश चिटणीस यांच्याकडून झाडांवर किंवा उंच ठिकाणी अडकलेल्या पक्ष्यांना काढण्याचे ट्रेनिंग घेण्यात आले. पशुतज्ज्ञांद्वारे जखमी पक्ष्यांना कसे हॅन्डल करावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. मदतकार्य त्वरित पाेहचेल, यासाठी प्रत्येक भागात प्रतिनिधी राहील, याबाबत व्यवस्था करण्यात आली.

साेशल मीडियावर नायलाॅन प्रचार

लाेकमतशी बाेलताना डाॅ. अभिक घाेष यांनी साेशल मीडियावर हाेत असलेल्या नायलाॅन मांजा विक्रीबाबत खंत व्यक्त केली. फेसबुक व ॲमेझाॅनसारख्या ऑनलाईन साईटवर सर्रासपणे नायलाॅन मांजाची जाहिरात केली जात आहे. व्हाॅट्सॲपवर शेअर करून खरेदी करण्यासाठी प्रचार केला जात आहे. महापालिकेच्या टीमद्वारे या तंत्रावर नजर ठेवून कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.