शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकांना व्यसनाधीन करण्यासाठी तस्कर सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:14 IST

शहरातील मादक पदार्थ तस्करीच्या व्यवसायात गुंतलेले तस्कर आता ट्रान्सपोर्ट व्यवसायातही जुळले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे संधिसाधू लोक त्यांचे स्वत:चे ट्रकचालक आणि इतर मालवाहू गाड्यांवरील चालकांना एमडी आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लावत आहेत.

ठळक मुद्देपोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी गंभीर : बातमीने मादक पदार्थ तस्करांमध्ये खळबळ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील मादक पदार्थ तस्करीच्या व्यवसायात गुंतलेले तस्कर आता ट्रान्सपोर्ट व्यवसायातही जुळले आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असे संधिसाधू लोक त्यांचे स्वत:चे ट्रकचालक आणि इतर मालवाहू गाड्यांवरील चालकांना एमडी आणि इतर मादक पदार्थांच्या व्यसनाची सवय लावत आहेत. ही वाहने शहराचा आऊटर रिंग रोड तसेच कामठी, कन्हान भागातून चालविली जात आहेत. या गाड्यांमध्ये तस्करीचा माल किंवा जनावरांची वाहतूकही केली जात आहे.अशा अवैध कारभारात गुंतलेली वाहने पोलिसांच्या कारवाईतून सुटण्यासाठी रात्री उशिरा गाड्या काढून लांब प्रवासाला निघत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या ट्रकचे चालक मादक पदार्थांचे सेवन केल्यानंतर नशेत कुठेही न थांबता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून निर्धारीत ठिकाणी पोहचतात. अशाप्रकारे तस्करांना त्यांचा माल निर्धारीत ठिकाणी पोहचविण्यासाठी व्यसनाधीन वाहनचालकांची मदत होते आणि असे चालक सहज त्यांना उपलब्ध होतात. नशा केल्यानंतर हे वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवितात. यादरम्यान कुणी मध्ये आला तरी गाडी थांबविली जात नाही.विशेष म्हणजे लोकमतने मादक पदार्थ तस्करांविरोधातील कारवाई मंद पडल्याची बातमी देताच तस्करीत गुंतलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. हे आरोपी पोलीस कारवाईचा धोका लक्षात घेत त्यांच्या हितसंबंधातील व्यक्तींशी संपर्क वाढविला आहे.त्यांचे लक्ष्य तरुण पिढीमादक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांसाठी तरुण पिढी प्रमुख लक्ष्य आहे. सूत्रानुसार काही वर्षापासून महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एमडी पावडरची विक्री केली जात आहे. या धंद्यात स्पर्धा वाढल्याने काही तस्करांनी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व्यसनाधीन बनविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यासाठी आधीच व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणींची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करी